पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ‘सेकंड इन चीफ’ व नागपूर जिल्ह्याचे प्रभारी खासदार प्रफुल्ल पटेल येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेतील गटनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. राज्यात सर्वत्र सकल मराठा समाजाच्या मोर्चाने राजकीय वातावरण तापले आहे. शिस्तबद्ध मोर्चांना लाभत असलेला उदंड प्रतिसाद अनेक प्रस्थापित नेत्यांचे टेन्शन वाढवणारा आहे. या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्ष व नेते सक्रिय झाले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नगरपालिका, फेब्रुवारीमध्ये दहा महापालिका व २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. या काळात राष्ट्रवादीचे लक्ष्य पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रित राहण्याची शक्यता असल्याने आधीच सर्व विभागांचा आढावा घेण्यात येत आहे. प्रफुल्ल पटेल यांची अलीकडेच नागपूर जिल्ह्याच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर पहिलाच मोठा मेळावा होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट