Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

डॉक्टरांची उसनवारी सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर
सरकारी वैद्यकीय महाविद्यालये चालविताना भारतीय वैद्यक परिषदेचे निकष पाळणे सक्तीचे आहे. त्यासाठी एमसीआयची टीम दरवर्षी महाविद्यालयांचे निरीक्षण करते. या निकषांना पात्र ठरण्यासाठी राज्यातील चौदाही शासकीय महाविद्यालये दरवर्षी शिक्षक पळवापळवीची कसरत करतात. गेल्या १५ वर्षांपासून हा खेळ सुरू आहे. मेयोतील ४० जागांवर आलेल्या संक्रांतीनंतर न्यायालयाने निकष काहीसे शिथिल केले. त्यामुळे सत्ताबदलानंतर तरी निदान हा खेळ थांबेल, अशी आशा होती. पण, तीही आता धुळीला मिळते की काय, अशी स्थिती आहे.

अकोला येथे एमसीआयची टीम लवकरच निरीक्षण करणार आहे. त्यासाठी नागपूर येथील शिक्षकांना तडकाफडकी बोलावण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भातला आदेश चक्क व्हॉट्सअॅप वर पाठविण्याचा प्रतापही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने करून दाखविला आहे.

अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या हा उसनवारीचा खेळ जोमात आला आहे. मध्यंतरी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी असाच खेळ झाला होता. त्यासाठी जे.जे.च्या ३० डॉक्टरांना रातोरात लातूरला पाठविण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्रुटी लपवण्यासाठी उपकरण नसताना वैद्यक परिषदेच्या डोळ्यांत धूळफेक करून इतर ठिकाणचे यंत्र दाखवणे, वसतिगृह नसल्यास ‘एमसीआय’ला नागपूरच्या मनोरुग्णालयातील गाळे वसतिगृह म्हणून दाखवण्याचा पराक्रम यापूर्वीही झाला होता. रातोरात बदलीचे अनेक प्रकारही पुढे आल्याने असंतोषाचा भडका उडाला होता.

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर अद्ययावत उपकरणे व बांधकाम तसेच महाविद्यालयात लायब्ररी, सभागृह बांधताना विद्यार्थी क्षमतांचा विचार केला नाही. यामुळे हे महाविद्यालय भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषात नापास ठरते. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा अनेक त्रुटी आहेत. त्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकषही समाविष्ट आहेत. ते लपविण्यासाठी नागपुरातील मेडिकल, मेयो तसेच चंद्रपूर, गोंदियातील वैद्यकीय शिक्षकांना अकोल्यात हजर होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. एमसीआयची टीम लवकरच ‘एमबीबीएस’साठी झडती घेणार आहे.

५० जागांना धोका

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १०० विद्यार्थीक्षमता होती. परंतु, अलीकडेच न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यात ५० जागांची भर पडली. यामुळे दीडशे विद्यार्थी क्षमतेसाठी महाविद्यालयातील पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे हे प्रवेश पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles