बेलतरोडी दुर्गाउत्सव मंडळातर्फे मंगळवारी शंकरपूर येथील खदानमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यादरम्यान विनोद हा खदानमधील पाण्यात बुडाला. तेथे असलेल्या युवकांना पोहोता येत नसल्याने कोणीही त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली नाही. एकाने घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीवरून हुडकेश्वर व हिंगणा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. अग्निशमन विभागालाही घटनेबाबत कळविण्यात आले. अग्निशमन विभागाचे जवानही तेथे पोहोचले. मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थंडावली. बुधवारी सकाळी पोलिस पोहोचले. ११.३० वाजतापर्यंत अग्निशमन विभागाचे जवान तेथे पोहोचले नाहीत. त्यामुळे नागरिक संतापले. यादरम्यान सामाजिक कार्यकर्ते बागुल यांनी गुमगाव येथील पट्टीचे पोहणारे वैभव मिस्किन, राजेंद्र गोवारकर, राजू शेंदूरकर व वसंता यांना बोलाविले. चौघेही १२.३० वाजताच्या सुमारास तेथे पोहोचले. वैभव हा थकलेला असल्याने पोहोण्याच्या स्थितीत नव्हता. पोलिस व त्याच्या मित्रांनी त्याला खदानीत उतरण्यास मनाई केली. यादरम्यान वैभव यानेही खदानीत उडी घेतली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट