Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

मेट्रो कोच निर्मितीचा कारखाना नागपुरात

$
0
0

pravin.lonkar@timesgroup.com
Twitter: @pravinlonkarMT
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याचा कार्यक्रम आखला जात आहे. मेट्रो रेल्वेसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी लागणारे साहित्य आजही आपल्याला वेगवेगळ्या देशांमधूनच आयात करावे लागते. हे परावलंबित्व कमी व्हावे, यासाठी नागपुरातच मेट्रो रेल्वे कोच निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. चीनसोबत १५ ऑक्टोबर रोजी याबाबतचा करार होत आहे.

नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्यांसाठी वेगवेगळ्या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. मेट्रो रेल्वेच्या कोच बनविण्याचे कंत्राट चीनच्या रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशनला देण्यात आले आहे. ८५१ कोटी रुपयांत हे काम देण्यात आले आहे. इतर शहरांत धावणाऱ्या मेट्रोच्या तुलनेत नागपुरातील मेट्रोचे डबे आकाराने छोटे असतील. गरज ओळखून पूर्णतः नवीन डिझाइन तयार करण्यात आले आहे. एकूण ६९ कोचची गरज नागपूर मेट्रो रेल्वेसाठी लागणार आहे. चीनने नागपुरात कायमस्वरूपी मेट्रो रेल्वेच्या कोचचा कारखाना टाकावा, यासाठी वरिष्ठ पातळीवर चीनशी बोलणी सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत बाबी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे.

जगात २० कंपन्यांकडून होते निर्मिती

नागपुरात कायमस्वरूपी मेट्रो रेल्वेच्या कोच तयार होतील. दिल्ली, मुंबई, कोची, बेंगळुरू, गुडगाव, कोलकाता, हैदराबाद, लखनौ आणि चेन्नई या शहरांत आता मेट्रो रेल्वे धावत आहे. देशातील इतर महानगरांतही मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शहरांची गरज भागविण्यासाठी नागपुरातील कोचनिर्मितीचा कारखाना उपयुक्त ठरेल. कमी किमतीमध्ये कोच उपलब्ध होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचा विचारही मांडण्यात आला आहे. जगात मेट्रो रेल्वेचे डब्बे बनविणाऱ्या २० कंपन्या आहेत. १५ऑक्टोबर रोजी हॉटेल रेडिसन्स ब्ल्यू येथे महाराष्ट्र शासन चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन (सीआरआरसी) यांच्यात हा करार होत आहे.


१५ टक्के पैशांची बचत

नागपूर मेट्रो रेल्वेसाठी कोच तयार करण्यासाठी चीन, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी या देशांची चर्चा केल्यानंतर चीनसोबत एनएमआरसीएलने करार केला. दिल्ली, मुंबई या शहरातून शंभरपेक्षा जास्त कोच निर्मितीचे काम देण्यात आले होते. नागपुरातील कंत्राट छोटे असल्याने अधिक पैसे मोजावे लागले असते. इतर शहरांतील मेट्रो कोचच्या तुलनेत नागपुरातील कोच आकाराने छोटे आहेत. ३.२ मीटरऐवजी २.९ मीटर रुंदी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे १५ टक्के पैशांची बचत झाली असल्याचा दावा एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>