Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

​ नऊशे फूट लांब कॅनव्हासवर बाबासाहेब

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

पेन्सिलद्वारे रेखाटन केलेल्या सात फूट उंच व नऊशे फूट लांब कॅनव्हासवर साकारलेल्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांच्या करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा समग्र आढावा घेणारे हे प्रदर्शन आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते. दीक्षाभूमी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात नाशिकच्या रेखाटन ट्रस्टतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र जीवन दर्शन या पेन्सिलद्वारे रेखाटलेल्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रप्रदर्शन प्रसिद्ध चित्रकार अशोक नागपुरे व किशोर नागपुरे यांच्या कल्पनेतून साकारले आहे. याप्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून तर बालपण, शिक्षण, विदेशातील शिक्षण, पत्रकारिता, प्राध्यापक व वकीली व्यवसाय त्यानंतर सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील उभारलेल्या चळवळीचा समावेश आहे. काळाराम मंदिर प्रवेश, महाड येथील चवदार तळे, कोरेगाव प्रसंग, भारतीय राजघटनेचे सादरीकरण, बौद्ध धर्माची दीक्षा, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले वास्तव्य, स्वत: वापरत असलेल्या वस्तू, वाहन, विविध भाव मुद्रा, वंशावळ अशा विविध प्रसंगाच्या समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>