मूळचे अमरावतीकर असलेले वानखेडे हे स्काउट ग्रुप या उद्योग समूहाचे संस्थापक असून सॉफ्टवेअर, सौरऊर्जा या सारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. सुरुवातीला सॉफ्टवेअर क्षेत्रातील आपली नोकरी सोडून त्यांनी उद्योग सुरू केला. कोणत्याही व्यावसायिकाला येणाऱ्या अडचणींवर मात करीत त्यांनी स्काउट ग्रुप या नावाने उद्योग नावारूपाला आणला. पार्किंग हा वानखडे यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कमी जागेत मोठ्या संख्येने वाहने कशी ठेवावीत, या विषयाचे त्यांनी पेटंट घेतले आहे. पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात त्यांनी यावेळी विविध उपाय मांडले. आपला मूळ जिल्हा असलेल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशिनचे वाटप केले. हा सगळा प्रवास वानखडे यांनी यावेळी मांडला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट