Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

राज्यात पहिल्यांदाच ‘ह्यूम्स लार्क’चे दर्शन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

भारताच्या उत्तरेकडील भागात आढळणाऱ्या पक्ष्याची महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील केकतपूर व नारायणपूर या तलावांवर हा पक्षी आढळून आला आहे. यामुळे पक्षीप्रमींमधून आनंद व्यक्त होत आहे. वाइल्ड लाइफ अॅण्ड एन्व्हायर्नमेंट कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या अभ्यासकांना हा पक्षी अमरावती जिल्ह्यात आढळून आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील केकतपूर आणि नारायणपूर या तलावांवर डिसेंबर २०१५मध्ये या पक्ष्याची नोंद घेण्यात आली होती. लार्क प्रजातीच्या इतर पक्ष्यांप्रमाणेच हा पक्षी दिसत असल्याने ओळख पटविण्यासाठी त्याची छायाचित्रे विविध संस्था आणि अभ्यासकांकडे पाठविण्यात आली. महाराष्ट्रात यापूर्वी हा पक्षी कधीही आढळला नसल्याने तज्ज्ञांकडून त्याची ओळख पटविणे आवश्यक होते. तज्ज्ञांनी हा पक्षी 'ह्यूम्स लार्क'च असल्याचे शिक्कामोर्तब केल्याने ही नोंद अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दरम्यानच्या काळात त्याच्या सवयीचा आणि आवाजाचा सखोल अभ्यास करण्यात आला. वाइल्ड लाइफ अॅण्ड एन्व्हायर्नमेंट कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या अभ्यासकांनी घेतलेली नोंद ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद ठरली आहे. पक्षी अभ्यासक निनाद अभंग, संस्थेचे सचिव डॉ. जयंत वडतकर, किरण मोरे व शिशिर शेंडोकार यांनी ही नोंद केली होती. दरम्यान, याच संस्थेचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार यांना अकोला येथे जानेवारी २०१६मध्येदेखील हा पक्षी आढळून आला.

उत्तरेकडील भागात ह्यूमचे वास्तव्य

ह्यूम्स लार्क हा पक्षी हिवाळ्यादरम्यान भारतात स्थलांतर करून येतो. सामान्यतः हा पक्षी गंगेचे खोरे, काश्मीर ते आसाम आणि मध्य प्रदेश या भागात आढळून येतो. याशिवाय, अफगाणिस्तान, बलुचिस्तान व पाकिस्तान या देशांच्या पहाडी भागातही या पक्ष्याचे अस्तित्व आढळते. मात्र, भारताच्या दक्षिणेकडील भागात हा पक्षी फारसा आढळून येत नाही. आकाराने चिमणीपेक्षा मोठा असलेला हा पक्षी मराठीत 'चंडोल' नावाने ओळखला जातो. हा पक्षी साधारणतः १४ सेंट‌ीमीटर आकाराचा व रंगाने करडा असतो. पंखावर काळपट रेषा, चोचेचा रंग प‌िवळा व त्यावर काळी रेष असते. इतर चंडोल पक्षांप्रमाणे डोक्यावर काळ्या रेषा नसतात. विदर्भात चंडोल पक्ष्याच्या सात प्रजाती सापडतात. वेक्स संस्थेचे पक्षी अभ्यासक या प्रजातीचा अधिक अभ्यास करीत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>