एनव्हीसीसीच्या प्रतिनिधींनी झोनची जाहिरात व आक्षेप सुनावणीसाठी दिलेल्या आठवडयाच्या कालावधीवरही नाराजी व्यक्त केली. २००१ मध्ये मनपाने तयार केलेल्या हॉकर्स झोनच्या धोरणातील अनेक रस्ते २०१६ च्या धोरणाच्या मसुद्यात मोकळे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. शहर फेरीवाला समितीने २८ रस्त्यांवरील हॉकिंग झोन वगळले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग, आयआरडीपी, डीपी आरक्षण आणि इतरांचा समावेश आहे. काही ठिकाणी तर, एकच रस्त्यांची नोंद दोनदा करण्यात आली आहे. हॉकर्स झोन तयार करताना धार्मिक, शाळा व रुग्णालयाच्या १०० मीटर परिसरात नको, रस्त्यांच्या दोन्ही भागाला नको, झोनसाठी किती जागा द्यावी, यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. झोनसाठी वैज्ञानिक पध्दतीने सर्वेक्षण न करता सरसकट रस्त्यांच्या बाजूलाच झोन तयार करण्यात आल्याचा आरोपही केला आहे. एनव्हीसीसीचे सहसचिव संजय अग्रवाल, सचिव जयप्रकाश पारेख, हुसैन अजानी आदींनी सुनावणीवेळी समितीसमोर भूमिका मांडत धोरणास व झोनला तीव्र विरोध केला.
सोमवारी एकूण २० आक्षेपांवर सुनावणी करण्यात आली. सकाळी ११ ते ५ अशी सुनावणीची वेळ होती. या काळात १७ आक्षेपकर्ते आले. त्यापैकी पहिल्या सत्रात ११ जणांनी त्यांचे आक्षेप नोंदविले. तर, दुपारी ३ नंतर उर्वरीतांना संधी देण्यात आली. शहर फेरीवाला समितीचे प्रमुख उपायुक्त रवींद्र देवतळे, सचिव बाजार समिती अधिक्षक देवराव उमरेडकर, तसेच सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) अश्फाक शेख, नासुप्रचे अभियंता डी.ए.गौर, ग्रीन व्हिजीलचे कौस्तुव चॅटर्जी, हॉकर्स युनियनचे प्रतिनिधी विनोद तायवाडे, अब्दुल रज्जाक कुरैशी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी संजय वाधवानी आदी उपस्थित होते.
महापौरांच्या आक्षेपानंतर महालातील झोन बदलणार
महापौर प्रवीण दटके यांनी बडकस चौकातील आईसक्रीम दुकानासमोर प्रस्तावित हॉकर्स झोनला विरोध दर्शवीत आक्षेप नोंदविला होता.समितीने महापौरांचा आक्षेपानंतर या झोनची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. आता या रस्त्यावरील हॉकर्स झोन दुसऱ्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात येणार आहे. यासाठी पर्यायाची शोधाशोध समितीने सुरू केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट