Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

प्रेमीयुगुलाची गोळ्या झाडून आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गोंदिया

बंदुकीच्या गोळ्या झाडून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी गोंदियानजीकच्या नवाटोला (घिवारी) परिसरात समोर आली. अंकित वैद्य (२८) व काजल मेश्राम (२२) अशी त्यांची नावे आहेत.

गोंदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून काजलने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला गेली होती. दिवाळीनिमित्त ती घरी आली होती. अंकितने रेल्वेत पायलटची परीक्षा उत्तीर्ण केल्याचीही माहिती आहे. दोघेही अंबाटोली परिसरात राहात होते. मंगळवारी दुपारपासून ते बेपत्ता होते. सायंकाळ होऊनही न परतल्याने पोलिस तक्रार देण्यात येणार असतानाच घिवारीनजीकच्या कालव्याशेजारी मुलगा आणि मुलीचा मृतदेह असल्याची माहिती त्यांना मिळाली. घटनास्थळी जावून पाहताच ओळख पटली. काजलचा मृतदेह धानाच्या शेतात पडला होता. तिच्या डोक्यावर बंदुकीची गोळी झाडल्याचे दिसून येत होते. तर पाच फूट दूर अंतरावर युवकाचा मृतदेह व जवळच देशी बनावटीची बंदूक पडली होती. दुचाकीही जवळच होती. त्यामुळे या दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हत्या की, आत्महत्या?
काजल आणि अंकित यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असला तरी दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडे बंदूक कुठून आली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>