Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

दिवाळीनंतर पेट्रोलपंप बंद!

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर
पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत प्रती लिटरमागे कमिशन वाढविण्याची शिफारस असतानाही केंद्र सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याविरोधात पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन संतप्त झाली आहे. नेहमीच कमिशन वाढविण्यासाठी हुलकावणी देणाऱ्या सरकारविरोधात दिवाळीनंतर ६ नोव्हेंबरपासून पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.

दरवर्षी पेट्रोलियम डीलर्सना देण्यात येणाऱ्या किमशनमध्ये प्रती लिटरमागे वाढ करण्याची महत्त्वाची शिफारस अपूर्वाचंद्र समितीने २०१० साली केली होती. समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतरही सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी, नागरिकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना आंदोलनाचा त्रास होऊ नये, यासाठी दोन आठवड्यानंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी पेट्रोलपंपवर सायंकाळी ७ वाजता ब्लॅक ऑउट करण्यात येईल. त्यानंतर दिवाळी असल्याने ग्राहकांना अडचणीत टाकायचे नाही, असा दावा करून ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी पेट्रोल, डिझेलची खरेदी करण्यात येणार नाही. तर, ५ नोव्हेंबर रोजी एका पाळीत काम करण्यात येईल. एवढे प्रयत्न करूनही काहीच हालचाली न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून पेट्रोल पंप बंद ठेऊ, असा इशारा दिला आहे. सोबतच देशातील सर्वच पेट्रोल पंपाना रविवारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र पेट्रोलियम ‌डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध, वीरेंद्र पटेल, हरविंदर सिंग भाटिया, प्रणय पराते यांनी पत्रपरिषदेत केली.

महत्त्वाच्या मागण्या

१ जानेवारी ते १ जुलै रोजी डीलर कमिशनची समीक्षा करावी.

१ जानेवारी ते १ जुलै रोजी डीलर कमिशनची समीक्षा करावी.

पेट्रोल पंपासाठी वापरलेल्या मालमत्ता मूल्यांची तपासणी करावी.

स्वच्छतागृहाच्या खर्चासाठी ‌दर निश्चित करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>