Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

मेयोतले डॉक्टर म्हणतात, मेडिकलला जा!

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

वेळ बुधवार रात्रीची. साकोलीतील ६३ वर्षांचे गृहस्थ मेयोत उपचारासाठी आले. कार्डही काढत नाहीत तोच निवासी डॉक्‍टरने त्यांना हातही न लावता आल्यापावली परत पाठविले. इतकेच नाही तर ‘मेयोत कशाला आलात, मेडिकलमध्ये जा’ असा फुकटचा सल्लाही दिला. त्यामुळे हतबल झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी कसेबसे मेडिकल गाठले. इथेही त्यांना गंडविण्याचा प्रकार समोर येत आहे.

ही व्यथा आहे, नत्थू जनबंधू या साकोली तालुक्यातील शिवनी बांधच्या रुग्णाची. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नत्थू यांना किडनीत दुखू लागल्याने त्यांना मुलगा मिलिंद यांनी गुरुवारी मेयोत आणले. पण, मेयोतल्या निवासी डॉक्टरांनी त्यांना हातही न लावता आल्यापावली मेडिकलकडे परत पाठविले. मेडिकलच्या किडनी युनिटमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. येथील औषधालयात सर्वच प्रकारच्या सलाईनच्या हजारो बॉटल्स उपलब्ध आहेत. परंतु, किडनी युनिटमधील डॉक्‍टरांनी नत्थुजीला सलाईन न लावता दोन पेट्या रून सलाइनच्या बॉटल खरेदी करण्यासाठी प्रीस्क्रिप्शन दिले. हातमोज्यांपासून ते औषधांपर्यंत सर्व साहित्य डॉक्टरने बाहेरून मागविले. डॉ. पंकज यांनी ही महागडी औषधाची चिठ्ठी लिहून दिल्यानंतर नत्थुजी यांच्या मुलावर अक्षरक्षः इतरांपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे.

पैसे नसतानाही मुलाने पैशाची जमवाजमव करून चार हजार रुपये खर्च केले. रुग्णाकडूनच हातमोजेदेखील मागविण्यात येत असताना विभागप्रमुख मात्र उघड्या डोळ्यांनी निवासी डॉक्‍टरांकडून सुरू असलेला आरोग्याचा खेळखंडोबा बघत असल्याचे बोलले जाते. मेडिकल प्रशासन निवासी डॉक्‍टरांना हातमोजे देखील उपलब्ध करून देत नाही का, हा सवाल रुग्णाचा मुलगा मिलिंद जनबंधू याने केला.

रुग्ण सिकलसेलग्रस्त

नत्थू हे सिकलसेलचे वाहक रुग्ण आहेत. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णाला मोफत रक्त देणे बंधनकारक आहे. परंतु, येथील डॉक्‍टरांनी रक्ताची जमवाजमव करण्याच्या सूचनादेखील रुग्णाच्या नातेवाईकांना दिल्या. यामुळे सिकलसेल नियंत्रणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमालाच हरताळ फासण्याचे काम मेडिकलमधील डॉक्‍टरांकडून होत असल्याचे दिसून येते.

सिकलसेल युनिट नावालाच

मेयोत सिकलसेल युनिट आहे. परंतु, येथे नत्थुला उपचार नाकारून मेडिकलमध्ये रेफर करण्याचा पराक्रम मेयोच्या कॅज्युअल्टीतील डॉक्‍टरानी केला. मेयोतून मेडिकलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे मेयो असो की, मेडिकल येथील डॉक्‍टर जबाबदारी ढकलण्याचे काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>