कुख्यात डॉन अरुण गवळी याला १२ दिवसांसाठी तुरुंगातून सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आज त्याचा पॅरोल अर्ज मंजूर केला.
गवळीच्या पत्नीवर २५ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ते कारण देत गवळीनं सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडं एका महिन्याच्या रजेची मागणी केली होती. मात्र, गवळी तुरुंगाबाहेर आल्यास कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते, असं मुंबई पोलिसांनी सांगितल्यानं विभागीय आयुक्तांनी त्याचा अर्ज नाकारला होता. त्यानंतर त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं त्याचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं गवळी आता २ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगाबाहेर राहणार आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. यापूर्वी मागच्या वर्षी मुलाच्या लग्नासाठी गवळी पॅरोलवर बाहेर आला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट