दिवाळीमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता २८ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान नागपूर- पुणे- नागपूर दरम्यान ८ विशेष सुरपफास्ट गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचा तपशील असा- ०२११८ नागपूर- पुणे- ही गाडी २८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी नागपूरवरून ११ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी २.४५ वाजता पुणे येथे पोहचेल. मार्गातील स्थानकांवर या गाडीच्या आगमन- प्रस्थान वेळा अशा राहतील- वर्धा (१२.०२, १२.०५), धामणगाव (१२.४५, १२.४६), बडनेरा (१३.४५. १३.५०), अकोला (१४.४५, १४.४८), भुसावळ (१६.३०, १६.४०), जळगाव (१७.०३, १७.०५), नाशिक (१९.१७, १९.२०), इगतपुरी (२०.५५, २१.०५), कल्याण (२२.४०, २२.४३), पनवेल (२३.३५, २३.४०), लोणावळा दुसऱ्या दिवशी (१.३०, १.३२).
०२११७ पुणे- नागपूर- ही गाडी २९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान पुण्यावरून दर शनिवारी १०.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १.३० वाजता नागपूरला पोहचेल. मार्गातील स्थानकांवर या गाडीच्या आगमन- प्रस्थान वेळा अशा राहतील- लोणावळा (११.२८, ११.३०), पनवेल (१३.००, १३.०५), कल्याण (१४.००, १४.०३), इगतपुरी (१५.४०, १५.४५), नाशिक (१६.२२, १६.२५), जळगाव (१९.००, १९,.०२), भुसावळ (१९.३०, १९.४०), अकोला (२१.३०, २१.३२), बडनेरा (२२.४०, २२.४५) धामणगाव (२३.१८, २३.१९), वर्धा (२३.५६, २३,.५८).
या गाडीला ८ द्वितीय श्रेणीच्या चेअर कार व २ द्वितीय साधारण श्रेणीचे कोच राहतील. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट