Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

नामांकित नको, जवळची शाळा द्या

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांना जंग जंग पछाडावे लागते. साधारणतः दरवर्षी हे चित्र कायमच असते. प्रवेशांची परिस्थिती अशी असताना आरटीई प्रक्रियेतून नामांकित शाळा मिळालेल्या अनेक पालकांनी मात्र त्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास नकार देणार आहे. नामांकित शाळा नको, जवळची शाळा द्या, अशी मागणी पालक करीत आहेत. आरटीईच्या नियमांनुसार शाळा बदलणे शक्य नसले तरी पालकांकडून येणाऱ्या अशा मागण्यांबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. प्रत्येक शाळेतील २५ टक्के जागा याकरिता राखून ठेवण्यात आल्या आहेत. यासाठीची सोडत मंगळवारी बी.आर.ए.मुंडले शाळेत आयोजित करण्यात आली होती. त्यातून १० सांकेतिक क्रमांक काढण्यात आले ‌होते. या क्रमांकांच्या आधारे नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने शाळांचे वाटप केले आहे.

कोणत्या विद्यार्थ्याला कोणती शाळा मिळाली, याची बुधवारी निश्चिती करण्यात आली. तसे एसएमएस पालकांच्या मोबाइलवर पाठविण्यात आले होते. विद्यार्थ्याचा आरटीई अर्ज क्रमांक, प्रवेशफेरी क्रमांक आणि मिळालेली शाळा, अशी माहिती या संदेशांमध्ये देण्यात आली आहे. ज्यांना कोणतीही शाळा मिळाली नाही, त्यांनादेखील एसएमएस पाठविण्यात आले आहेत. पहिल्या फेरीत आपल्याला कोणत्याही शाळेत प्रवेश मिळालेला नाही. दुसऱ्या फेरीच्या तारखा संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येतील, असे पालकांना कळविण्यात आले आहे. १९ ते २८ मे या कालावधीत पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेश नक्की करावे लागणार आहेत.

दरम्यान, अनेक पालकांनी नामांकित शाळांमध्ये प्रवेश नाकारण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या प्रक्रियेत सहभागी असलेल्या आरटीई अॅक्शन कमिटीकडे पालक शाळा बदलण्याच्या मागण्या घेऊन येत आहेत.

नामांकित नसली तरी चालेल पण जवळची शाळा मिळावी, असा आग्र‌ह पालक धरीत आहेत. त्याकरिता काय करावे लागेल, असे प्रश्न पालक विचारत आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार एकदा मिळालेल्या शाळेत बदल केला जाणार नाही. त्यामुळे, म‌िळालेल्या शाळेत प्रवेश घेणे किंवा प्रक्रियेतून बाहेर पडणे असे पर्याय पालकांसमोर उरणार आहेत.



एसएमएस झाले जम्प आरटीई प्रक्रिया आणि अडचणी हे समानार्थी शब्द झाले असून यंदाही त्याचा अनुभव येण्यास सुरूवात झाली आहे. अनेक पालकांना पाठविलेले एसएमएस 'जम्प' होत आहेत. आपापले मोबाइलचे इनबॉक्स रिकामे ठेवावे अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या असतानाही असे प्रकार झाले आहेत. यामुळे, आता पालक आणि शिक्षण विभाग यांच्यासमोरील डोकेदुखी वाढणार आहे.

शाळेतील प्रवेशासाठी हे करा

 प्रवेशासाठी जाताना प्रवेशपत्र, आवश्यक कागदपत्रे न्या

 कागदपत्रे व निवासाची तपासणी शाळा करतील.

 दिलेल्या कालावधीतच शाळेत प्रवेशाबाबत संपर्क साधावा.

 पालकांचा पासवर्ड हरविला असल्यास जन्मतारखेची मदत घेऊन तो परत मिळवावा.

 अपलोड केलेली व शाळेत सादर करावयाची कागदपत्रे सारखी असावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>