काटोल तालुक्यातील येनवा या गावात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्काम केल्यानंतर सकाळी ग्रामस्थांशी संवाद साधताना संपूर्ण गावाची पाहणी केली. गावामधील विहिरीमध्ये असलेला कचरा, गावात फेरफटका मारताना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याचे ढीग तत्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना देताना गावातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पशुवैद्यकीय दवाखान्याचे पाहणी करताना गावातील पशुंच्या उपचारासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच औषधोउपचाराची माहिती घेतली. स्वच्छता ठेवा
गावात पिण्याच्या पाण्यासाठी हॅण्डपंपचा वापर करत असतानाच बाजूला असलेल्या कचरा व अस्वच्छतेसंदर्भात ग्रामविकास अधिकाऱ्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करताना पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी हा परिसर कायम स्वच्छ राहावा, अशी ताकीद दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठीच खर्च करा, असे सांगताना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर मशीन बसवा व नागरिकांना शुध्द व आरओ असलेले पाणी द्या, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट