या धर्मसंस्कृती महाकुंभाचे विशेष आकर्षण देशभरातील सर्व जाती-धर्मांचे ११०० संत हे ठरणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या राहण्याची सामान्य नागपूरकरांकडेच केली जाणार आहे. यासोबतच सर्व सातही प्रमुख पीठाच्या शंकराचार्यांची एकाच वेळी एकाच मंचावर उपस्थिती राहणार आहे. दीड लाखाहून अधिक भक्तगण यांत सहभागी होणार आहेत. त्यांची संपूर्ण नागपूर शहरातून पालखी मिरवणूक निघणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे पूर्ण वेळ या कार्यक्रमात उपस्थित असतील. तर याचदरम्यान २२ हजार महिलांची विशेष मातृसंसद होणार असून त्याचे उद्घाटन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन करणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट