Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

नापिक जमिनीवर बांबूचे उत्पादन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर
देशातील ४५ टक्क्यांहून अधिक शेतजमिनीला नापिकीचा धोका असल्याची आकडेवारी अलीकडेच जाहीर करण्यात आली. कृषी क्षेत्रापुढे हे आवाहन पेलण्याकरिता सक्षम तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. शहरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतर्फे (नीरी) अशी नापिक जमीन बांबूच्या उप्तादनाकरिता कशी वापरता येईल याकरिता एक यशस्वी प्रकल्प राबविला जात आहे. त्याकरिता खापरी येथील नापिक जमिनीचा उपयोग केला जात आहे.

कळमेश्वरजवळील खापरी या गावातील एक एकर नापिक जमीन ही बांबू उप्तादनाकरिता वापरली जात आहे. याकरिता नीरीतर्फे ‘मायक्रोब असिस्टेड’ हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात आला असून, त्यांच्या सहाय्याने हा प्रकल्प राबविला जात असल्याची माहिती नीरीतर्फे प्राप्त झाली आहे. मार्च २०१६ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. यात बांबूच्या एकूण ४८७ रोपांची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड नापिक असलेल्या जमिनीवर करण्यात आली आहे, हे विशेष. यापूर्वी देशात या प्रकारचे प्रकल्प राबविण्यात आले आहेत. परंतु, या प्रकल्पात पहिल्यांदाच ५० वेगळ्या प्रजातींच्या बांबूच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे, हे विशेष. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना सप्टेंबर २०१७ पासून लाभ मिळण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. याखेरीज नीरीतर्फे खेरी येथे ३२०० रोपट्यांची, खापरी येथे १४०० रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. यात बांबू तसेच विविध औषधी वनस्पतींचा समावेश आहे. अलीकडेच या रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित, या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. लाल सींग, खेरी गावाचे सरपंच प्रशांत आदळे, दिनेश जोशी, शुद्धोदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बांबू उत्पादन हे शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन ठरू शकते. केवळ २ ते २.५० लाख रुपयांची लागवड केल्यास चार वर्षांमध्ये १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना प्राप्त होऊ शकते. तसेच याकरिता सुपीक जमीन वापरण्याची गरज नाही. नापिक जमिनीवरसुद्धा हा प्रयोग यशस्वी ठरू शकतो.

राकेश कुमार, संचालक, नीरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>