Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

सिटीस्कॅन करायचाय? दीड महिन्यांनी या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

मेंदू हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव असतो. यात काही बिघाड झाला, तर उपचारांची दिशा ठरविण्यासाठी सिटीस्कॅनची चाचणी करावी लागते. मेडिकलमध्ये उपचाराला येणाऱ्या गरीब रुग्णांना ही निदान चाचणी करता यावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून डिजिटल सिटीस्कॅन उपकरण खरेदी करण्यात आले. मात्र, ही निदान चाचणी करण्यासाठी रुग्णांना दीड महिन्यांच्या पुढची तारीख दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. विशेष म्हणजे, मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीत अशी स्वतंत्र यंत्रणा असतानाही ती केवळ काही तासच सुरू रहात असल्याने रुग्णांची प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे.

मेंदूचे आजार, अपघात झाले तर मेंदूच्या क्रियेत बिघाड निर्माण होण्याची जोखीम असते. अशा वेळी उपचारांची दिशा ठरविण्यासाठी सिटीस्कॅन निदान चाचणी सुचविली जाते. मेडिकलमध्ये अलीकडेच ट्रॉमा केअर युनिट सुरू झाले आहे. त्यामुळे अशा तक्रारी घेऊन उपचारांना येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र असे रुग्ण आल्यास त्यांना सिटीस्कॅनसाठी रेडिऑलॉजी विभागात पाठविले जाते.

तिथे आल्यानंतर रुग्णांच्या हाती दीड महिन्यांनंतरची तारीख सोपविली जाते. ज्या रुग्णांना बाहेरून ही चाचणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडते, असे रुग्ण खासगीत जाऊन चाचणी करून आणतात. खासगीत अशा चाचणीसाठी किमान चार ते आठ हजार रुपये खर्चावे लागतात. मात्र, इतरही आर्थिक कुवत नसलेल्या रुग्णांचे त्यामुळे हाल सुरू असल्याचीही माहिती या निमित्त समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>