Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

चटईच्या बॉक्समध्ये सापडले एक कोटी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती मार्गावरील वाडी भागात छापा टाकून चटईच्या बॉक्समधील १ कोटी ५०० रुपयांच्या जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या. याप्रकरणात दोघांना एसबीच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत दोघांची कसून चौकशी सुरू होती. वृत्त लिहिपर्यंत दोघांची नावे कळू शकली नाहीत.

अमरावती येथून मालवाहू वाहनामध्ये जुन्या नोटा नागपुरात आणण्यात येत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने वाडी भागात सापळा रचला. टाटाएस हे मालवाहू वाहन एसीबीला दिसले. एसीबीने झडती घेतली असता चटईच्या बॉक्समध्ये पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आढळल्या. एसीबीने दोघांना ताब्यात घेऊन सिव्हिल लाइन्समधील कार्यालयात आणले. मशिनद्वारे मोजणी केली असता ही रक्कम एक कोटी ५०० रुपये होती. ती कोणी पाठवली, नागपुरात कोण ही रक्कम कोण ‘व्हाइट’ करून देणार होता, याची कसून चौकशी दराडे करीत आहेत. १४ नोव्हेंबरला हिलटॉप येथील अॅडव्होकेट सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये पावणेदोन कोटी रुपये आढळले होते. पोलिसांनी सीए दीपक अग्रवाल यांच्यासह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चलनातून रद्द झालेल्‍या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा यात समावेश होता. ही रक्कम भूखंड खरेदीसाठी आणण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>