देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा बाद केल्या. काही अतिमहत्त्वाची ठिकाणे वगळता इतर सर्व ठिकाणी या नोटांवर बंदी घालण्यात आली. अखेर इतर कुठेच न चालणाऱ्या जुन्या नोटा अनेक भक्तांनी देवाच्या चरणी अर्पण केल्या. टेकडी गणेश मंदिरातील दानपेटी उघडल्यानंतर त्यातून पाचशे व हजारांच्या नोटांपोटी १ लाख ३५ हजार ५०० रुपये आढळून आले.
जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याने साठवून ठेवलेल्या काळ्या पैशाला कवडीचीही किंमत राहली नाही. हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी एकाहून एक क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत. कुणी कमिशन देऊन सर्वसामान्यांच्या आधार कार्डचा आधार घेऊन काळा पैसा पांढरा करीत आहेत. असे प्रयत्न सुरू असले तरी या प्रक्रियेला एक विशिष्ट मर्यादा आहेत.
मंदिरातील दानपेट्यांमध्येही जुन्या नोटा टाकू नये, अशा स्पष्ट सूचना देऊनही इतर ठिकाणी न चालणाऱ्या नोटा भक्तांना गणेशाच्या चरणी अर्पण केल्या. टेकडी गणेश मंदिरातील दानपेटी उघडल्यानंतर त्यातून १ लाख ३५ हजार ५०० रुपयांच्या ५०० आणि १ हजारांच्या नोटा आढळून आल्या. दानपेटीतून एकूण सव्वा आठ रुपये लाख रुपये प्राप्त झाले. यातील ५० हजार रुपयांचे सुटे पैसे आणि इतर नोटांच्या स्वरूपात आहेत. पाचशेच्या २०५ आणि १ हजारच्या ३३ नोटा प्राप्त झाल्या.
दररोज बँकेत भरा पैसा
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पेट्रोलपंप, रुग्णालये इथे जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरात अशा जुन्या नोटा स्वीकारू नयेत, अशा स्पष्ट सूचना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. मंदिराला दानस्वरूपात प्राप्त होणारा पैसा त्याच दिवशी बँकेत जमा करण्याच्याही सूचना आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे शक्य नसल्याचे सांगत अनेक मंदिरांनी हात वर केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट