Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

आज प्रचारतोफा थंडावणार

$
0
0

विदर्भाच्या सात जिल्ह्यांतील ४५ नगर परिषदांसाठी उद्या मतदान

टीम मटा

विदर्भातील सात जिल्ह्यातील ४५ नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा आज, शनिवारी थंडावणार आहेत. युतीची राज्य पातळीवर घोषणा होऊनही जिल्हा पातळीवर स्वतंत्रचा नारा देण्यात आल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. थेट नगराध्यक्षपदामुळे दावेदारी वाढली आहे. पक्षीय उमेदवारांसोबतच स्थानिक पातळीवरील आघाड्यातील बळ दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत. सक्षम अपक्ष बंडखोरांमुळेही स्पर्धा वाढली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विदर्भात तळ ठोकून आहेत. अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांचीही चंद्रपुरात सभा झाली.

दिल्ली ते गल्लीचे स्वप्न रंगवित भाजपने नगर परिषद निवडणुकीत कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी सभांचा जोर आजमावला आहे. युतीचा निर्णय बारगळल्याने शिवसेनाही स्थानिक पातळीवर दंड थोपटून आहे. तर लोकसभा, विधानसभेनंतर भाजपने आश्वासनभंग केल्याचे काँग्रेस प्रचारादरम्यान सांगत आहे. मत मागत आहे. पण, आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्याने ताकद विभागली गेली आहे. भारिप बहुजन महासंघासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभा होत आहेत. अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात एमआयएने एन्ट्री केल्याने काँग्रेसचा परंपरागत मतदार विभागला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच थेट नगराध्यपदामुळे आशा बळावल्याने अपक्षांचेही ‌पीक आले आहे. यांचे मोठे आव्हान पक्षीय उमेदवारांसमोर आले. राष्ट्रीय पातळीवरचे विषय या निवडणुकीत गौण ठरत असल्याने स्थानिक मुद्दयांना जोर आला आहे. सर्वच ठिकाणी चौरंगी आणि पंचरंगी लढतीचे चित्र आहे.

डाव्या हाताच्या बोटांवर शाई असणाऱ्यांनी प्रमाणपत्र घ्या

डाव्या हाताच्या बोटांना बँकेकडून शाई लावली असेल, तर अशा मतदारांनी आज, शनिवारी ५वाजेपर्यंत आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन शाई लावलेले बोट दाखवून त्यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. ते मतदानाकरिता आवश्यक राहणार आहे. बँकेमार्फत मतदारांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली असल्यास काळजी नसावी, असे मतदार थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकतात, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सिंदेवाहीत ‘पहिल्या’साठी धडपड

चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या सिंदेवाही नगरपंचायत निवडणुकीसाठी १६ हजार मतदार मतदान करणार आहेत. ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रथमच होत असलेल्या या नगरपंचायत निवडणुकीत आपलाच पक्ष पहिल्यांदा सत्तेवर आणण्यासाठी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सर्वशक्तीनिशी आपल्या पक्षाच्या उमेदवारीच्या निवडणूक प्रचाराला लागले आहेत.


निवडणूक कुठे?

बुलडाणा जिल्हा

बुलडाणा

चिखली

मेहकर

मलकापूर

देऊळगाव राजा

सिंदखेड राजा

जळगाव-जामोद

नांदुरा

खामगाव

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ

दिग्रस

पुसद

उमरखेड

वणी

घाटंजी

आर्णी

दारव्हा

अकोला जिल्हा

अकोट

बाळापूर

मूर्तिजापूर

तेल्हारा

पातूर

वाशीम जिल्हा

कारंजा

वाशीम

मंगरुळपीर

अमरावती जिल्हा

अचलपूर

अंजनगाव सुर्जी

वरुड

चांदूर बाजार

मोर्शी

शेंदूरजना घाट

दर्यापूर

चांदूर रेल्वे

धामणगाव


वर्धा जिल्हा

वर्धा

हिंगणघाट

आर्वी

सिंदी

पुलगाव

देवळी


चंद्रपूर जिल्हा

बल्लारपूर

वरोरा

मूल

राजुरा

सिंदेवाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>