पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीने देशातील सर्वसामान्यांना कामधंदे सोडून बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत असल्याने नियोजनाअभावी उद्भवलेली स्थिती आणखी चिघळण्याचा धोका असल्याची भीती माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत बनकर यांनी अनेक समर्थकांसह पूर्व नागपुरातील शुभ आशिष लॉनमध्ये झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीतून अलीकडे काँग्रेसमध्ये आलेले प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना मुत्तेमवार यांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रांगेत उभे
राहण्यामुळे गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांना प्राण देखील गमवावे लागले. अशीच स्थिती राहिल्यास गंभीर संकट ओढवेल, असेही ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. देशात हुकुमशाही, एकाधिकारशाही आणि असहिष्णुता निर्माण होण्याची स्थिती आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे विचारच देशाचे रक्षण करू शकतात. त्यामुळे यापुढे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते काँग्रेसची कास धरतील, असा दावा अतुल लोंढे यांनी केला. व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस प्राचार्य बबन तायवाडे, अभिजित सपकाळ, अभिजित वंजारी, मुजीब पठाण, गिरीश पांडव, बाळ कुळकर्णी उपस्थित होते.
डॉ. बनकर यांच्यासह माथाडी मंडळाचे सदस्य राजेश
माकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष किशोर पलांदूरकर, राष्ट्रवादी महिलाच्या माजी प्रदेश सचिव पिंकी वर्मा, शहर सचिव सोमेश्वर ठाकरे, आनंदी बावनकर, भोजराज बोंद्रे, प्रणय जांभुळकर, शंकर चिकणे, राहुल मिरासे, संदीप देशपांडे,
पुरुषोत्तम मानकर, शंकर डाखोडे, प्रमिला यादव, निहकत शेख, शाहिस्ता शेख, संजय नगरारे, राजू शाहू, विजय रामटेके, जाकेश वानखेडे, पुणाजी गायकवाड, अमोल धोपटे, सुरेश बागडे, मधुकर ढोले, कृष्णराव कावळे, डॉ. विशाल बनकर, ढेलुराम सेलोटिया, राजेश पुरी, फिरोज शेख, अजहर शेख, संतोष वर्मा, प्रवीण ढगे, वंदना धोटे, कांता मुरकुटे आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट