Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

​ नोटबंदीनंतरची पहिली ‘ट्रायल’ आज

$
0
0



म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

केंद्र सरकारने ५०० व हजार रुपयांची नोट बंद केल्यानंतर बदललेल्या वातावरणात नगर परिषदांच्या माध्यमातून सरकारची पहिली ट्रायल आज, रविवारी होणार आहे. ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात नाराजी आहे अथवा नाही यावर सुरू असलेले दावे-प्रतिदावेही निकाली निघतील. चार टप्प्यातील ट्रायलनंतर महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये खरी कसोटी होणार आहे.

विदर्भातील यवतमाळ, अकोला, वाशीम, अमरावती, बुलडाणा, वर्धा आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यात ४५ नगर परिषदांमध्ये पहिल्या टप्प्यात आज, रविवारी मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. सरकारने थेट निवडणुकीचा निर्णय घेतल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे. थेट अध्यक्षाच्या निवडीमुळे पक्षांची पंचाईत झाली. काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांप्रमाणेच भाजपसमोरदेखील आव्हान उभे ठाकले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी वजनदार उमेदवारांचा शोध सुरू झाला. बहुतांश ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशाच लढती होणार आहेत. काही नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादीचा तर एखाद-दोन ठिकाणी शिवसेनेसह इतर पक्षांचा जोर आहे. नोटाबंदीचा प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा दावा करणारे भाजप नेतेही आतून थोडे अस्वस्थ आहेत. या स्थितीचा फायदा मिळावा, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न असून भाजपनेदेखील पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत दिवाळीनंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले. नोटाबंदीमुळे प्रचारातील अन्य मुद्दे दुय्यम झाले. सत्तारुढ नेत्यांकडून हा निर्णय कसा चांगला व अर्थव्यवस्था कशी मजबूत होईल, यावर मतदारांना आकर्षिक करण्यात आले तर, विरोधी पक्षाकडून या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कशी कोलमडली आणि शेतकरी व गावकऱ्यांसमोर कसे संकट ओढवले, याची चित्र रंगवण्यात आले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी नेत्यांनी झंझावती दौरे करून सभा गाजवल्या. केंद्र व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपने स्वस्थ न बसता कार्यकर्त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे व्यस्त ठेवले. महासदस्य अभियानापासून सुरू झालेली संघटनेची वाटचाल आता जनसंवादच्या माध्यमातून सरकारच्या उपलब्धी जनतेपर्यंत पोहचवण्यात येत आहेत. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, शेतमालाला भाव आदी मुद्दे काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उपस्थित करून सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्ती न झाल्याचा आरोप करण्यात आला.

--पुरोगामी लोकशाही मोर्चा

वरोरा (विनोद घरले), मूल (पौर्णिमा लोनबाले), बल्लारशा (राजू झोडे), यवतमाळ (प्रा. सुनंदा वालदे), देसाईगंज वडसा (निलोफर अंजुम), हिंगणघाट (सीताराम भुते), वर्धा (सुनील पांगुळ), आर्वी (प्रा. संजय वानखेडे), गोंदिया (छैलबिहारी अग्रवाल) आणि तुमसर (अरुण लांजेवार).

--विदर्भ माझा

शेगांव (माधुरी देशमुख), अंजनगाव सुर्जी (मंजुषा लाडे), बाळापूर (शेख जम‌िर), वाशीम (ललिता दाभेराव), देऊळगांव राजा (शबाना कोटकर), मलकापूर (शिवचंद्र तायडे), वर्धा (सुधीर पांगुळ), राजुरा (प्राचार्य अनिल ठाकुरवार).

--आज मतदान होणाऱ्या नगर परिषदा

--यवतमाळ : यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, घाटंजी, आर्णी दारव्हा.
--अकोला : अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा व पातूर.
--वाशीम : कारंजा, वाशीम, मंगरूळपीर.
--अमरावती : अचलपूर, अंजनगावसूर्जी, वरूड, चांदुरबाजार, मोर्शी, शेंदुरजनाघाट, दर्यापूर, चांदूर रेल्वे व धामणगाव.
--बुलडाणा : शेगाव, नांदुरा, मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली, बुलडाणा, जळगाव-जामोद, देऊळगाव राजा.
--वर्धा : वर्धा, हिंगणघाट, आर्वी, सिंदी, पुलगांव, देवळी.
--चंद्रपूर : बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा, सिंदेवाही (नवीन न.पं.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>