समाजाच्या बळावर सत्तेत आले. मात्र, सरकारदरबारी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले नाहीत. मोर्चाला पाठिंबाही दिला नाही, याबाबत रोष व्यक्त करीत धनगर समाजबांधवांनी पशुसंवर्धनमंत्री महादेवराव जानकर, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या विरोधात चलेजावच्या घोषणा देत त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही नेत्यांनी समोपचाराने घेत तेथून जाण्यात धन्यता मानल्याने तणाव निवळला.
समस्त धनगर समाजातर्फे राज्य सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आमदार रामराव वडपुते, रमेश देवाजी पाटील, पुरुषोत्तम डाखोडे, अॅड. एस. सरोदे, माजी आमदार हरिभाऊ भदे व प्रकाशराव शेषणे यांच्या नेतृत्वात समाजबांधवांनी मोर्चा काढला. मोर्चात दोन हजारांपेक्षा अधिक समाजबांधवांचा समावेश होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा दुपारी १ वाजताच्या सुमारास मॉरिस कॉलेज टी पॉइन्टवर पोहोचला. ‘मागणी आमच्या हक्काची, आरक्षणाची अंमलबजावणी करा’, अशी मागणी मोर्चेकरी करीत होते. यादरम्यान डॉ. महात्मे मोर्चास्थळी आले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये संताप पसरला. धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी कुठलेही पद घेणार नाही, असे आश्वासन महात्मे यांनी समाजाला दिले होते. मात्र, आरक्षण मिळण्यापूर्वीच महात्मे राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे समाजबांधवांमध्ये प्रचंड रोष होता. तो बघता महात्मे तेथून परतले. त्यानंतर काही वेळातच महादेवराव जानकर व विनायक मेटे मोर्चास्थळी आले. त्यांना बघताच मोर्चेकऱ्यांनी जानकर यांच्याविरोधात घोषणा दिल्या. सत्तेत आल्यानंतरही आरक्षण मिळाले नाही. जानकर यांनी सभागृहात आरक्षणाबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत, त्यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले. ‘जानकर चलेजाव’, अशा घोषणा दिल्या. तणाव वाढत असल्याचे बघून जानकर व मेटे आल्यापावली परतले.
‘सत्तेत आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवू, मी संपूर्ण अभ्यास केला आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितले होते. आता मात्र त्यांनी घूमजाव केले आहे. खासगी संस्थेकडून पुन्हा सर्वेक्षण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनीही दगाबाजी केली असा आरोप रमेश पाटील यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट