Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

चोराच्या घरी चोरी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

चोराच्या घरी चोरी करणाऱ्या चोरट्यांसह तिघांना पाचपावली पोलिसांनी सिनेस्टाइल अटक केली. त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कमलेश शंकरराव दुपारे (वय २२, रा. समता मैदान, लष्करीबाग) व कुशल मनोज नंदेश्वर (वय १९, रा. बारसेनगर) व रूपेश चुनबाद शाहू (वय ३१, रा. कबाडी लाइन), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

कमलेश हा चोरटा आहे. त्याने मोतीबाग रेल्वे क्वॉर्टरमधील घरातून एसईडी चोरी केला. कमलेश याने चोरी केलेला एलईडी घरी ठेवल्याची माहिती रूपेशला मिळाली. त्याने कमलेश याच्या घरी चोरी करून एलईडी लंपास केला. याबाबत कमलेशला कळताच त्याने रूपेश याच्याशी संपर्क साधला. कुशल याच्या मदतीने दोघांमधील वाद मिटविण्यात आला. दरम्यान, तिघेही दारू पित असल्याची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बहादुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल अनिल ठाकूर, शिपाई राजेश देशमुख, रोशन तिवारी, प्रदीप पवार, ज्ञानेश्वर जाधव यांच्या पथकाने सिनेस्टाइल सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने एलईडी, असे एकूण दीड लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>