माजरी येथील एक इसम काहींना सोबत घेऊन शिरणा नदीच्या बाजूला असलेल्या वाडीत गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करीत आहे अशी गुप्त माहिती प्राप्त झाल्यानंतर माजरी पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. तेव्हा चार इसम सीताफळाच्या झाडाखाली अंधारात बसलेले दिसले. त्यांच्याजवळील पोत्यात पाच मोठे जिवंत वटवाघुळ, सात नग लिंबू, दोन गुलालाच्या पुड्या, लहान टॉर्च दिसला तर एक संत्र्याच्या जमिनीत झाडाखाली खोल खड्डा केलेला दिसला. सुरेश लिंगय्या बडगू (वय ५०) हा माजरी कॉलरी राहणारा सुरक्षा गार्ड असून उर्वरित विश्वास भिकाजी जांभूळे (२८), रमेश गोविंदा भानारकर (४०), अमर आत्माराम गुरनुले (२४) हे तिघजण चिमूर तालुक्यातील राहणारे आहेत. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असता गुप्तधन काढण्यासाठी सदर पक्षांवर अनिष्ट व अघोरी विद्या करून पैशांचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने सदर प्रकार करीत असल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपी विरोधात माजरी येथे महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट