मेट्रो रेल्वेचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी पुलाचे काम प्री-कास्ट तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. यासाठी वर्धा रोडवर जामठ्याजवळ २२ एकरमध्ये वर्गवारीनुसार प्री-कास्ट बॉक्स गर्डर निर्मितीला प्रारंभ झाला आहे. दोन पिलरमध्ये पूर्वीच तयार झालेले गर्डर क्रेनच्या साह्याने बसविण्यात येणार आहे.
प्रकल्पात गेल्या आठवड्यात बॉक्स गर्डरची निर्मिती सुरू झाली. सध्या चार ते पाच गर्डर तयार झाले आहेत. या कामाला वेग येऊन दरदिवशी चार गर्डर तयार होणार आहेत. पुलासाठी एकूण २ हजार ३९० गर्डरची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पात गर्डरसाठी दोन क्रेनसह चार बेड तयार केले आहेत. गर्डर तयार झाल्यानंतर त्याला क्रेनच्या मदतीने हटविण्यात येते. पोलादाच्या मोठ्या ढाच्यात पोलाद आणि काँक्रिट टाकून तयार करण्यात येते. प्रकल्पात काँक्रिट तयार करण्यासाठी मोठे युनिट आहे. मजबुतीसाठी काँक्रिटचे योग्य मिक्सिंग आवश्यक असते. या प्रकल्पात दोनशेपेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. बॉक्स गर्डरवर मेट्रो रेल्वेसाठी रुळ टाकण्यात येणार आहेत. यावर दोन ट्रॅक (अप-डाऊन) राहील. पुलाखाली दोन पिलरमध्ये १० गर्डर राहतील. त्याच्या मजबुतीसाठी स्टीलच्या (एचटीसी) तारांनी एक-दुसऱ्याला बांधण्यात येणार आहे.
प्री-कास्ट तंत्रज्ञानात गुणवत्ता असते. कमी गुंतवणुकीत कमी वेळेत काम होते. दिल्ली मेट्रो रेल्वेच्या पुलात लावलेल्या गर्डरच्या तंत्रज्ञानाने तयार होत आहे. पण येथे आकारमानात आंशिक बदल करण्यात आला आहे. शहरात काम करताना सुरक्षा आणि वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून सेगमेंटल प्री-कास्ट बॉक्स गर्डर सर्वोत्तम आहे. एवढ्या मोठ्या आकाराच्या बॉक्सला साइटवर तयार करणे कठीण आहे. तयार गर्डर निश्चित अंतरावर बसविण्यात येणार असल्याचे एनएमआरसीएलकडून सांगण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट