Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

सौंदर्य खुलविण्यासाठी हर्बलच उपाय भारी

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

आरशात बघायला आवडत नाही, अशी ना मुलगी आढळेल ना स्त्री. आपले सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी 'सजना हैं मुझे'ची ओढ प्रत्येकीलाच असते. महिलांमध्ये उपजत असलेल्या सौंदर्याच्या असोशीला पूरक अशा टिप्स 'मटा'ने शनिवारी खास महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत देण्यात आल्या.

'मटा'च्या चौथ्या वर्धापनदिन सप्ताहाच्या सोहळ्यानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहल डवरे यांनी धनवटे सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत सहभागी महिलांना सौंदयाची निगा कशी राखावी, याबाबत सहजसोप्या भाषेत टिप्स दिल्या. कार्यशाळेत त्यांनी त्वचा आणि केस यांचे सौंदर्य जपणे आणि स्वतःची निगा राखणे यांबाबत मार्गदर्शन केले. सोपे उपाय आणि त्यातही हर्बल साधने वापरून सौंदर्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. केसांची निगा राखण्यासाठी रोज मसाज करणे, तसेच हिरव्या पालेभाज्या खाणे, केसांच्या मुळांना तेलाची मालिश करणे असे विविध उपाय सुचविले. केस धुताना हर्बल शाम्पू, आवळा किंवा शिकेकाई यांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.



त्वचेची घ्या रोज काळजी

कोरडी, तेलकट आणि सामान्य त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी डवरे यांनी विविध उपाय सांगितले. तेलकट त्वचा असल्यास मुरूम येण्याचा धोका असतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दिवसातून तीन ते चार वेळा आपला चेहरा धुवावा, अशी सूचना त्यांनी केली. चेहरा साफ करण्यासाठी दही, ताक, मध किंवा साखर अशा पदार्थांचा वापर करावा. ब्लिचिंग करण्यासाठी मसूर डाळ, मध आणि टोमॅटो ज्यूस यांचे मिश्रण वापरावे, असे हर्बल उपायदेखील त्यांनी सुचविले. या कार्यशाळेला नागपूरकर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



टिप्स सौंदर्याच्या

केसातील कोंडा घालविण्यासाठी वापरा मध आणि लिंबू किंवा दही.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा स्टीमचा वापर.

जास्त तेलकट खाऊ नका.

मेकअप करण्यापूर्वी वापरा मॉइश्चरायजर आणि मेकअप काढण्यासाठी क्लिन्सिंग मिल्क.

घराबाहेर पडण्याच्या १५ मिनिटे अगोदर लावा सनस्क्रीम लोशन.

तेलकट त्वचेसाठी वापरा वॉटरप्रूफ मॉइस्चरायजर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>