Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

‘अज्ञातांकडून काही खाऊ नका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर
रेल्वेत प्रवास करताना कुणाही अज्ञात व्यक्तीने दिलेले पदार्थ खाऊ नये. त्यामुळे धोका होण्याची भीती असते असा सावधतेचा इशारा देणारी पत्रके आरपीएफतर्फे शनिवारी रेल्वे स्थानकावर वितरित करण्यात आली. आरपीएफच्या 'इमेज बिल्डिंग' उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.

रेल्वे प्रवासात गुंगीचे औषध देऊन लुटण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. या प्रकारात अनेकदा प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. बोगीत आपल्या बाजूला बसून चांगली ओळख करायची आणि नंतर स्वतःजवळील खाद्यपदार्थ खायला द्यायचे किंवा मधल्या स्थानकावर गाडी थांबली की प्लॅटफॉर्मवर उतरून एखादे पेय घ्यायचे आणि त्यात आधीच गुंगीचे औषध मिसळायचे, असे प्रकार नेहमीच सर्रास होत असतात. त्यामुळे प्रवासात खाद्यपदार्थांबाबत कुणावरही विश्वास ठेवू नका, असे आवाहन आरपीएफतर्फे करण्यात आले. प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांनाही ही पत्रके वितरित करण्यात आली. हा उपक्रम मंडळातील अन्य रेल्वे स्थानकांवरही राबविण्यात आला. प्रवासादरम्यान कोणतीही समस्या उदभवल्यास १८२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. या मोहिमेत आरपीएफ निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक होतीलाल मीना, के. एन. राय, बी. एस. यादव यांच्यासह आरपीएफचे कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>