प्रणोती ही पदवीधर होती. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. तिचे वडील विवेक हे रेशन दुकानात काम करतात. सोमवारी विवेक यांचे मावस भाऊ रमेश यांचे आजाराने निधन झाले. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्याची तयारी सुरू होती. याच दरम्यान, एक मुलगा दरवाजाजवळ ठेवलेल्या कुलर खालची चप्पल काढायला आला. कुलरला धक्का लागला. तो पडणार असे वाटत असल्याने वर्षा यांनी कुलर पकडला.त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर सायली यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही विजेचा धक्का बसला. कूलर पडत असताना प्रणोतीने कुलरला पकडले. तिला विजेचा जबर धक्का बसला. तिघीही बेशुद्ध झाल्या. नातेवाइकांनी तिघींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रणोतीला तपासून डॉक्टरांनी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात सांगितले. मेयो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रणोतीला मृत घोषित केले. अन्य दोघींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्रणोतीच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. प्रणोतीची आई विनीता या गृहिणी आहे. त्यांना मोनाली ही लहान मुलगी, तर मयूर नावाचा मुलगा आहे. दोघेही शिक्षण घेत आहेत.
अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले
रणोती अत्यंत हुशार होती. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. काही दिवसांपूर्वीच तिने बँकेची परीक्षा दिली. आता ती एमपीएससीची तयारी करीत होती. अधिकारी होऊन आई-वडिलांची सेवा करण्याची तिची इच्छा होती. मात्र, नियतीला हे मंजूर नव्हते. काळाने झडप घेतली अन् हुशारी विद्यार्थिनी नाहीशी झाली, अशा शब्दांत तिच्या नातेवाइकांनी भावना व्यक्त केल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट