Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर सेमिनरी हिल्स येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपाल (श्वानपथक) असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून प्रवास भत्त्याचे बिल काढण्यासाठी तीन हजारांची लाच घेणाऱ्या वनरक्षकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. महादेव श्रीकृष्ण कुलकुले (वय ४७), असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.

तक्रारकर्ते वनपाल कर्मचारी खापा येथील कार्यालयात तैनात होते. त्यांचा चार वर्षांचा प्रवास भत्ता देण्यासाठी कुलकुले यांनी वनपालाला १० हजारांची लाच मागितली. लाच द्यायची नसल्याने वनपालाने एसीबीकडे तक्रार केली. अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने खापा येथे सापळा रचला. 'मी दहा हजार रुपये देऊ शकत नाही', असे वनपालाने कुलकुले याला सांगितले. त्यानंतर तीन हजार रुपये दिल्याशिवाय बिल काढणार नसल्याचे कुलकुले याने सांगितले. त्यानंतर वनपालाकडून तीन हजार रुपये घेताच एसीबीच्या पथकाने कुलकुले याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>