Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

कसे येणार एड्सवर ‘नियंत्रण’?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

तिचे वय १३ वर्षे. जन्मतःच नियतीने तिच्याशी क्रूर थट्टा केली. काही कळायच्या आतच आई-बाप गेले. आजीचा पदर तिच्या जगण्याचा आधार. आता दोन वर्षांनी तिला दहावी उत्तीर्ण होऊन कॉलेजला प्रवेश घ्यायचाय. निरागस डोळे, त्यात हजारो स्वप्ने. पण दबा धरून बसलेला काळ कधी डाव साधेल नेम नाही. जगायचे असेल तर एआरटीशिवाय दुसरे गत्यंतर नाही. दोन महिन्यांपासून ती औषधेही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे तिची निरागस स्वप्ने अकाली कोमेजतात की काय, अशी स्थिती. ही व्यथा आहे, गंगा-जमना परिसरातली चिमुकली सिया (नाव बदललेले) हिची. देहव्यापार करणाऱ्या शेकडो महिलांचा टाहो याहून वेगळा नाही.

एचआयव्ही एड्सची बाधा झालेल्या या रुग्णांना गेल्या दोन महिन्यांपासून एआरटी सेंटरमधून औषधेच मिळत नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न या रुग्णांसमोर उभा ठाकला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहरात असे नेमके किती रुग्ण आहेत, याचा आकडाच एड्स नियंत्रण सोसायटीकडे उपलब्ध नाही. संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी तनुजा शेवारे यांनी ही कबुली दिली आहे. औषधे मिळत नसल्याने गंगा-जमनातील काही महिलांनी गुरुवारी पत्रकारांशी साधलेल्या संवादात ही व्यथा मांडली. गेल्या आठ वर्षांपासून एआरटीची औषधे घेत असलेल्या नयना (नाव बदललेले) सांगत होत्या, 'मला रोज तीन गोळ्या याप्रमाणे महिन्यातून ९० गोळ्या लागतात. गोळी घेतल्याशिवाय रोग प्रतिकारशक्ती कायम रहात नाही. मात्र, दोन महिन्यांपासून औषधच मिळेनासे झाले आहे. ज्योती (नाव बदलले) यांची व्यथा याहून वेगळी नाही. मूळच्या ओडिशातील ज्योती सांगत होत्या, एका गोळीसाठी १७ रुपये खर्च करावे लागत आहेत.

दुसरीकडे सरकार देहव्यापारावर बंदी घालत असल्याने खायची भ्रांत आहे. अशा स्थितीत गोळ्या कुठून विकत घेणार? औषधांसाठी महिन्याला चार हजारांचा खर्च आम्हाला परवडणारा नाही. त्यामुळे डोळ्यांपुढे मरण पाहात बसण्याखेरीज दुसरा मार्ग नसल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने गंगा-जमना परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठी प्रकल्प राबविला जातो. या महिलांना समुपदेशनाच्या माध्यमातून एआरटी सेंटरवरून औषधे घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यासंदर्भात केंद्राच्या प्रकल्प व्यवस्थापक हेमलता लोहवे म्हणाल्या, 'गंगा-जमना परिसरात १५० एचआयव्ही बाधित महिला आहेत. त्यापैकी ४८ महिला एआरटीच्या औषधांवर जगत आहेत. मात्र, औषध मिळत नसल्याने खंड पडून या महिला मृत्यूच्या दाढेत लोटल्या जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>