Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

लोकबिरादरीला नव्या कार्यकर्त्यांची साथ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली

भामरागड तालुक्यातील हेमलकसात बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. तीन राज्यांच्या सीमेवरील घनदाट जंगलात उपेक्षित जीवन जगणाऱ्या आदिवासींना आरोग्य शिक्षणासह जीवन जगण्याची संधी यातून मिळाली. पण, गेल्या ४० वर्षात प्रकल्पाचा पसारा वाढला. त्यासाठी नव्या दमाचे कार्यकर्ते प्रकल्पात दाखल झाले आहेत. आमटे कुटुंबातील तिसऱ्या पिढीसोबत काम करीत 'दुर्गम' विकासाचा ध्यास जोपासत आहेत.

भामरागड हा राज्यातील सर्वाधिक मागास तालुका आहे. १९७०च्या दशकात या भागापर्यंत पोहचण्यासाठी रस्ते नव्हते. अर्धनग्न अवस्थेत राहणारे आदिवासी वीज, रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराचा अभाव असे एकूणच चित्र होते. बाबा आमटे यांनी हे चित्र बदलण्याचा ध्यास घेतला. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना जबाबदारी दिली. लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. १९७४मध्ये डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा यांनी गवताने साकारलेल्या बांबूच्या झोपडीतून दवाखाना सुरू केला. सोबतीला विलास व रेणुका मनोहर, गोपाळ व प्रभा फडणवीस, जगन व मुक्ता मचकले, दादा पांचाळ, बबन पांचाळ, मनोहर व संध्या येम्पलवार हे कार्यकर्ते होते. त्यांच्या माध्यमातून लोकबिरादरी प्रकल्पाने ४० वर्षांचा प्रवास केला. मधल्या काळात लोकबिरादरीत अनेक बदल झाले. रुग्णालयाचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुपांतर झाले. साध्या तापावरही उपचार न होणाऱ्या ठिकाणी आता आदिवासींना जीवनदान मिळत आहे. शाळेतून डॉक्टर, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस घडविले जात आहेत.

प्रकाश आमटे यांच्या सोबतीचे कार्यकर्ते आता निवृत्तीच्या वयात आहेत. आमटे परिवारातील डॉ. दिगंत आणि अनिकेत या तिसऱ्या पिढीने प्रकल्पाची धुरा खांद्यावर घेतली आहे. डॉ. दिगंत व त्यांची पत्नी अनघा लोकबिरादरी रुग्णालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर अनिकेत प्रकल्पाच्या व्यवस्थापन सांभाळत आहेत. त्यांची पत्नी समीक्षा शिक्षणाची जबाबदारी पाहात आहेत. या नव्या दमाच्या सोबतीला नवे कार्यकर्तेही मिळाले आहेत. प्रफुल्ल पवार व पुण्याहून मिथील कुलकर्णी या प्रकल्पात काम करण्यासाठी सहभागी झाले आहेत. तसेच लोकबिरादरी आश्रमशाळेचे माजी मुख्याध्यापक गोपाळ फडणवीस यांचा मुलगा केतन, विलास मनोहर यांचा मुलगा अंजिक्य हे दोघेही या कामात सहभागी झाले आहेत. सचिन मुक्कावार हे येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आणि बांबू हस्तकलेची जबाबदारी सर्मथपणे सांभाळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील नीलेश भारती प्रकल्पातील डेअरी व्यवस्था पाहात आहेत. नव्या दमाने आदिवासी विकासाचे कार्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>