Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

काँग्रेसचे पदाधिकारी ठरले

$
0
0

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांची कार्यकारिणी आणि शहर तसेच जिल्हाध्यक्षांची सोमवारी घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष शोभा ओझा यांच्या संमतीनंतर महाराष्ट्राच्या प्रभारी नीता डिसुझा यांनी पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. नागपूरच्या अध्यक्षपदी प्रज्ञा बडवाईक तर, ग्रामीणच्या अध्यक्षपदी शांताबाई कुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यकारिणी व अनेक जिल्ह्यांच्या अध्यक्षांची घोषणा झाली नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे महिला आघाडीकडेही आता लक्ष देण्यात आले आहे.

अशी आहे कार्यकारिणी

जिल्हाध्यक्ष - भंडारा- सीमा भुरे, वर्धा- हेमलता मेघे, गडचिरोली- भावना वानखेडे, गोंदिया- उषा सहारे, चंद्रपूर शहर- अनिता कठारे, ग्रामीण- अश्विनी खोब्रागडे, वाशीम- ज्योती गणेशपुरे, अकोला शहर- सुषमा नीचल, ग्रामीण- साधना गावंडे, अमरावती शहर- अर्चना सवई, ग्रामीण- छाया धांदळे, बुलडाणा- वर्षा वानरे, यवतमाळ- सीमा तेलंग.

प्रदेश उपाध्यक्ष वनमाला राठोड, विजया धोटे (यवतमाळ), मीनल आंबेकर (बुलडाणा), डॉ. संजीवनी बिहाडे (अकोला), उषा मेंढे (गोंदिया). सरचिटणीस - कांता पराते, डॉ. रिचा जैन, तक्षशीला वागधरे, ममता गेडाम (नागपूर), जयश्री शेळके, डॉ. तबस्सुम हुसेन (बुलडाणा), कांचनमाला गावंडे, उषा उटणे (अमरावती), नंदा अलुरवार (चंद्रपूर), सचिव- डॉ. रेखा बाराहाते, शील्पा जवादे, ज्योत्स्ना कुमरे, वैशाली मानवटकर (नागपूर), डॉ. स्वाती देशमुख, डॉ. वर्षा बडगुजर (अकोला), डॉ. अस्मा काझी (यवतमाळ). सदस्य- ज्योती झोड (नागपूर), अर्चना राऊत, आशा चंदन, विभा राऊत (अकोला), दुर्गा मिश्रा (यवतमाळ). ममता गेडाम व डॉ. अस्मा काझी यांचे नाव मूळ यादीत नव्हते, पुरवणी यादीत त्यांचा समावेश करण्यात आला. सल्लागार परिषदेत जयंती मुजुमदार (नागपूर), पुष्पा बोंडे (अमरावती), डॉ. रजनी हजारे (चंद्रपूर), पुष्पा नागपुरे (यवतमाळ) व नंदिनी कायंदे (बुलडाणा) यांचा समावेश आहे. एनजीओ सेल- प्रतिभा उके (मुख्य समन्वयक, नागपूर), वर्षा निकम व विजया सांगळे (समन्वयक, यवतमाळ). प्रोफेशनल सेलमध्ये विदर्भातून एकाचाही समावेश नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>