Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

हेल्पलाइनला केव्हा मिळणार हेल्प?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर नागरी सुविधा म्हणून देण्यात आलेल्या नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या http://nagpur.nic.in/ या संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांक गेल्या कित्येक महिन्यांपासून 'आउट ऑफ सर्व्हिस' आहे. संकेतस्थळावरील अनेक लिंक निरुपयोगी असूनही प्रशासनाची झोप उघडत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्याबाबत कुणालाही अधिकृत माहिती हवी असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळालाच अधिक पसंती दिली जाते. मराठी आणि इंग्रजीमध्ये हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करीत असल्याने निवडणुकीसंबंधी जिल्ह्यातील सर्व माहिती या कार्यालयात प्राप्त होते. अशा महत्त्वपूर्ण कार्यालयाचे संकेतस्थळ मात्र चुकीच्या माहितीने भरले आहे.

जो टेलिफोन क्रमांक अस्तित्वातच नाही, तो क्रमांक या संकेतस्थळावर दाखवून जिल्ह्यातील नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहेत. संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वांत खालच्या बाजूला उजवीकडे हेल्पलाइन अशी लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आयव्हीआरएस म्हणजेच ऑनलाइन इंटरअॅक्टिव व्हाइसओव्हर रिस्पॉन्स सिस्टीमचे चित्र समोर येते. इथे ०७१२-२५५००२९ हा क्रमांक देण्यात आला आहे. यावर कॉल केल्यानंतर हा नंबरच अस्तित्वात नसल्याचा संदेश येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>