अक्षय संजय सहारे (वय १८) रा. नाईक तलाव, गुप्ता चौक, तेलीपुरा असे जखमी तरुणाचे नाव आहे. अक्षय हा मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता आपल्या दुचाकीने घरी जात होता. गोळीबार चौकातून जात असताना दुचाकीमुळे रस्त्यांवरील चिखल रोशन एकनाथ चिचघरे (वय १८) रा. गोळीबार चौक, टिमकी आणि त्याचे दोन भाऊ अंकुश आणि सचिन यांच्या अंगावर उडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी अक्षयला शिवीगाळ केली. प्रत्युतरादाखल अक्षयनेही शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी त्याला पाहून घेण्याची आणि घरात घुसून मारण्याची धमकी दिली. यानंतर अक्षय दुचाकीने निघून गेला. 'तुम्ही येथेच थांबा, मी मित्रांसोबत परत येतो,' असे सांगत तासाभरात अक्षय परत गोळीबार चौकात आला. तेव्हा तीनही भावंडांनी त्याच्यावर चाकूहल्ला करीत गंभीर जखमी केले. तीनही आरोपी खासगी कामे करतात, तर अक्षय हा विद्यार्थी आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट