Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

प्रवेशक्षमता वाढवा ३० टक्क्यांनी!

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

नवीन शैक्षणिक सत्रामध्ये नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमधील प्रवेशक्षमता ३० टक्क्यांनी वाढविली जावी या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‌राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी आणि विद्यार्थी नेते अॅड. पंकज डहाके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकांनी विद्यापीठ परिसरात निदर्शने आणि घोषणाबाजीही केली. यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कुलगुरू अॅड. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. नवीन शैक्षणिक सत्रामध्ये नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमधील प्रवेश क्षमता ३० टक्क्यांनी वाढविली जावी, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनास परवानगी मागितली जाईल आणि ३० टक्के प्रवेश क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, सौरभ मिश्रा, ईश्वर बाळबुधे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles