Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

तावडेंना आवडे ‘टकटक'

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या टायपिंगच्या टकटक सुरांना रामराम करून ऑनलाइन परीक्षा घेण्याचे अधिकाऱ्यांचे मनसुबे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी धुडकावले. त्यामुळे काही बाजूंनी आनंद तर काही बाजूंनी संताप व्यक्त होत आहे.

ही मुदतवाढ दोन सत्रांसाठी असेल. त्यामुळे मे २०१७ पर्यंत विद्यार्थ्यांना मॅन्युअल टायपिंग परीक्षा देता येणार आहे. यातून काही संस्‍थाचालक सुखावले असले तरी काहींना धक्का बसला आहे. सर्वत्र माहिती-तंत्रज्ञानाचे वारे वाहत असताना पारंपारिक टायपिंग सुरू असल्याने काही संस्थाचालकांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष गंगाधर म्हमाने यांनी मॅन्युअलऐवजी ऑनलाइन टायपिंग परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यंदा पहिल्यांदा ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. पण, या परीक्षेचा निकाल कमी लागला. काही विद्यार्थी एक-दोन गुणांनी अनुत्तीर्ण झाले. ही बाब काही संस्‍थाचालकांना चांगलीच खटकली. कमी गुणांनी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने पेपरची फेरतपासणी करण्याची मागणी काही संस्‍थाचालकांनी पुण्यात आंदोलनाद्वारे केली. परंतु, एकदा परीक्षा झाल्यानंतर पुन्हा पेपरची फेरतपासणी करता येत नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले.

दरम्यान, ‌शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे काही संस्‍थाचालकांनी मॅन्युअल टायपिंग परीक्षेला मुदतवाढ देण्याचा आग्र्रह धरला. यावर परिपत्रक काढण्यासाठीही साकडे घालण्यात आले. आता मॅन्युअल टायपिंगला मुदतवाढ मिळाली आहे. तर, यात तावडे यांनी हस्तक्षेप केल्याने हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत. परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन टायपिंग परीक्षा योग्य असल्याचे सांगितले होते. पहिल्यांदा निकाल कमी लागल्याने ऑनलाइनचे दरवाजे बंद करता येणार नाहीत, असा दावाही म्हमाने यांनी केला होता. तरीही, तावडे यांनी मॅन्युअल टायपिंगला मुदतवाढ देण्याचे ठरविल्याने अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.



निर्णयाला आव्हान! शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात काही संस्थाचालक हायकोर्टात जाणार आहेत. येत्या महिनाभरात औरंगाबाद किंवा नागपूर खंडपीठात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. तर, जुनमध्ये झालेली मॅन्युअल परीक्षा शेवटची असेल, त्यानंतर ही परीक्षा ऑनलाइनद्वारेच होईल, असे परिपत्रक परीक्षा परिषदेने काढले होते. मात्र, तावडे यांनी अधिकाऱ्यांच्या निर्णयाला बाजूला सारत मॅन्युअलला मुदतवाढ दिली. सरकारने मॅन्युअल टायपिंगला मुदतवाढ देण्याचे अजूनही परिपत्रक काढलेले नाही, असा दावा परीक्षा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर म्हमाने यांनी 'मटा'शी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>