विद्यापीठाकडून कापूस, सोयाबीन, भुईमूग,करडी, सूर्यफुल, जवस, मोहरी, मूग, उडिद, हरभरा, ज्वारी, धान, गहू या पिकांमधील ७१ वाण नोंदणीकरिता सादर करण्यात आले होते. त्यापैकी ३२ वाणांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. तर, उर्वरित पीक वाणांची नोंदणी लवकरच करण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बहुमान मिळविला. कृषी विद्यापीठांनी वाणांची नोंदणी केल्याने खासगी संस्थांसोबत करार करताना वाणांपासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून हक्क मिळण्यास मदत होणार आहे तसेच कृषी विद्यापीठाच्या सर्वांगिण विकासाचा मार्ग यातून सोयीस्कर होणार आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. एम. मानकर, उपसंचालक (बियाणे) डॉ. डी. टी. देशमुख यांना डॉ. स्वामीनाथन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेला केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव एस. के. पटनायक, सहसचिव आर. के. सिंग, कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. टी. महापात्रा, डॉ. आर. एस. परोदा, पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदाचे व्यवस्थापक डॉ. आर. सी. अग्रवाल, डॉ. आर. आर. हंनचनाल आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट