Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

नागपूरचा जगप्रीत झाला ‘मनप्रीत’

$
0
0



नागपूर : नागपूरचे आजोळ असलेल्या अंध गायक जगप्रीत बाजवाने साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. सारेगमपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या जगप्रीतवर व त्याच्या गायकीवर जगभरातून प्रेमाचा वर्षाव होतो आहे.

वयाच्या सहाव्या महिन्यातच कॅन्सरमुळे दोन्ही डोळ्यांनी अंध झालेल्या जगप्रीत बाजवाचा जन्म तसा कॅनडाचा. पण, त्याची आई अमरजितचे माहेर नागपूरचे आहे. १९८० सालापासून अमरजित यांचे कुटुंबीय वर्धा रोडवरील प्रशांतनगरमध्ये वास्तव्यास आहेत. सारेगमपच्या प्रमोशनसाठी जगप्रीत नागपूरला आला असता त्याची आजी, मामा आदी नातेवाइकांनी त्याला भेटण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. जगप्रीतचे कुटुंब सध्या कॅनडात वास्तव्यास असून त्याचे वडील जगबीरसिंग बाजवा यांनी 'मटा'शी संवाद साधला. ते म्हणाले, 'जगप्रीतला लहानपणीच दोन्ही डोळ्यांना कॅन्सरचे ग्रासले. त्यामुळे दोन्ही डोळे काढावे लागले होते. लहानपणापासून जगप्रीत गाणी ऐकत बसायचा. त्याची ही आवड बघून त्याला शास्त्रीय संगीताचा क्लास लावून दिला. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने कॅनडामध्ये पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. पुढे त्याने भारतीय शास्त्रीय संगीतात पदवी प्राप्त केली आणि नंतर पाश्चात्य संगीताचा डिप्लोमाही पूर्ण केला.'

जगप्रीतला भारतीय व पाश्चात्य असा एकूण १३ भाषा येतात. या सर्व भाषांमधील गाणी तो तितक्याच ताकदीने गाऊ शकतो. याशिवाय त्याला फिरण्याची आवड असून स्विमिंग, ट्रेकींग, हॉर्स राय‌डिंग आदी त्याचे आवडते क्रीडा प्रकार आहेत. त्याच्या काकांनी लिहिलेल्या गझलांनी जगप्रीतने संगीतबद्ध केले असून त्याचा अल्बमही निघालेला आहे. कम्युनिटी लीडरशिप, क्वीन एलिझाबेथ टू डायमंड ज्युबिली आदी पुरस्कार त्याला प्राप्त झाले आहेत. 'जगप्रीतमध्ये प्रतिभा आहे. या कार्यक्रमातला तोच एक असा गायक आहे जो सर्व प्रकारची गाणी गाऊ शकतो. सलमान खान, ऐश्वर्या राय अशा अनेक सेलिब्रिटींकडून आणि मेंटरर्सकडून त्याचे कौतुक झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>