Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

माजी अध्यक्षांचे पंखच छाटले!

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास असलेल्या नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये (एनव्हीसीसी) माजी अध्यक्षांना मानाचे स्थान आहे. पण, सध्याच्या अध्यक्षांच्या कार्यकाळात एककलमी हुकूम सुरू असल्याचे दिसते. एकीकडे निवडणुकीचा पत्ता तर नाहीच. अशात, माजी अध्यक्षांचे महत्त्व संपुष्टात आणून त्यांचे पंखच छाटण्यात आल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

एनव्हीसीसी ही विदर्भातील व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना आहे. विदर्भभरातील १२५ व्यापारी संघटना प्रतिनिधी या नात्याने तर जवळपास १२०० अन्य वैयक्तिक, असे एकूण १३०० हून अधिक याचे सदस्य आहेत. ही संघटना संपूर्ण विदर्भातील व्यापाऱ्याला दिशा देण्याचे काम करते. मात्र, मागील काही वर्षांपासून संघटनेला राजकारणाची कीड लागली आहे. यंदाच्या कार्यकारिणीत (२०१५-१६) हे राजकारण पराकोटीला गेल्याचे जाणवत आहे.

एनव्हीसीसीत नवीन वर्षी कुठले पदाधिकारी असतील, हे सहसा माजी अध्यक्षांची सुकाणू समितीच ठरवत असते. सुकाणू समितीचा एनव्हीसीसीच्या नियमावलीत समावेश नसला तरी माजी अध्यक्ष या नात्याने त्यांना महत्त्व आहे. समितीने निश्चित केलेल्या निर्णयाविरुद्ध सहसा कोणीच जात नाही. गेले तरी त्याचा निवडणुकीत विजय होण्याची शक्यता कमीच असते. पण, आता नवीन अध्यक्षांनी या सुकाणू समितीला चेम्बर म्हणून पूर्णपणे बेदखल केले आहे. एकाही कार्यक्रमासाठी माजी अध्यक्षांना बोलवले जात नाही. ज्येष्ठ सदस्य या नात्याने त्यांचा कुठलाही सन्मान केला जात नाही की त्यांचा सल्ला घेतला जात नाही. यामुळेच आता सुकाणू समितीचे महत्त्वदेखील राहिलेले नाही. 'बेइज्जती करून घेण्यासाठी चेम्बरमध्ये जाण्याची आमची इच्छा नाही', अशा भावना माजी अध्यक्ष व्यक्त करीत असून हे चेम्बरची पत राखण्याच्यादृष्टीने भीषण मानले जात आहे.



कुठे गेली निवडणूक?

आतापर्यंत कायम जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात झालेली निवडणूक चेम्बरमध्ये अद्यापही झालेली नाही. वित्त व लेखा अहवाल अंतिम नाही. पैसे न भरल्याने वेबसाइट ठप्प आहे. त्याची पदाधिकाऱ्यांना माहितीही नाही. अशा सर्व स्थितीत जुलैचा अखेरचा आठवडा सुरू होत असताना चेम्बरमध्ये नेमके सुरू काय आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्य म्हणजे सध्याचे अध्यक्ष अन्य ठिकाणी एका समाजात अध्यक्ष आहेत. तिथेही त्यांनी आठ महिने लोटले तरी अद्याप निवडणूक घेतलेली नाही. यामुळेच सदस्यांमध्ये असंतोष वाढत आहे. त्याची ठिणगी कधीही पडू शकते, अशी स्थिती चेम्बरमध्ये निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>