गेल्या काही वर्षांपासून जगातील हवामानावर प्रभाव पाडणारा 'अल निनो' आता संपला आहे. त्याची जागा 'ला नीना'ने घेतली आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन पूर्व मध्य आशियात पाऊस, वादळ आणि महापुराचा धोका हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
अल निनोमुळे पूर्व मध्य विषुववृत्तीय पॅसिफिक महासागराचे तापमान सरासरीपेक्षा वाढते. तर 'ला नीना'मध्ये तेथील तापमान ३ ते ५ अंशाने कमी होते. या कमी होणाऱ्या तापमानामुळे पाऊस, वादळ आणि महापुराचा धोका असतो. म्हणूनच या वर्षी भारतात आणि पूर्व आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे भाकीत हवामानतज्ज्ञांनी केले होते. 'अल निनो' आणि 'ला नीना' हे जागतिक हवामानाचे एक चक्र असून ते दर तीन ते सात वर्षांनी कमी, मध्यम किंवा अधिक प्रमाणात हवामानाला प्रभावित करते. अल निनो व ला नीनाचा मोठा प्रभाव दोन वर्षे असतो. नंतर तो कमी होत जातो.
भारतात अल नीनाचा प्रभाव २०१६ ते २०१८पर्यंत राहील. त्यानुसार हे वर्ष ला नीनाचे असल्यामुळे भारतासह मलेशिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया येथे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१६ महिन्यात अधिक पाऊस राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता, अशी माहिती सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
'अल निनो'चे प्रभाव वर्ष
१९७२ -७३
१९७२ -७३
१९८२ - ८३
१९८६ - ८८
१९९१ - ९२
१९९७ - ९८
२००२ - ०३
२००९ - १० ...................... 'ला नीना'चे प्रभाव वर्ष
१०७० - ७१
१९७५ - ७६
१९८८ - ८९
१९९८ - २०००
२००७ - ०८
२०१० - ११
२०१६- १७
२०१५ - १६
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट