संघनिर्मित भाजप तसेच कट्टर दलितविरोधी शिवसेनासारख्या पक्षासाठी काम करून आठवले यांनी आपली दयनीय अवस्थेचे दर्शन घडविले आहे. मंत्रिपदासाठी भीक मागणारा सच्चा आंबेडकरवादी असू शकत नाही. त्याउपर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचे आवाहन करून ते काय सिद्ध करू इच्छित आहेत, असा टोलाही लगावला आहे. डॉ. आंबेडकर यांनी मागासवर्गीय, ओबीसी आणि देशातील गरीब जनतेच्या उद्धारासाठी मंत्रिपद घेतले होते. परंतु, त्यांच्या उद्धारासाठी काम करताना त्यांनी मनुवादी विरोधी लोकांकडून त्रास झाल्याने व त्यांना काम करू दिले जात नसल्याने मंत्रिपदाला लाथ मारली. मायावतीही शोषित, पीडित लोकांच्या उद्धारासाठी आवाज उठवितात. त्यांच्या हक्कासठी नेहमीच लढतात. म्हणून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात निळ्या झेंडयाची सत्ता आल्याची आठवण गरुड यांनी आठवलेंना करून दिली आहे. महापुरुषांच्या नावाने जिल्हे, विद्यापीठांना नावे देवून व संपूर्ण राज्यात महापुरुषांच्या नावाने सरकारी योजना राबविल्या. यावरून खरा आंबेडकरवादी कोण? हे समजून घेण्याची गरज आहे. आठवले यांचे लज्जास्पद व बेताल वक्तव्याने समाजाचे दुर्देवी चित्र ते इतरांपुढे मांडून विचारशील समाजाची लाज चव्हाटयावर आणू पाहात आहेत. आठवलेंनी अशा बेताल वक्तव्ये न करता मिळालेले काम व्यवस्थित सांभाळले तरी खूप होईल, असा टोला गरुड यांनी लगावला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट