Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

धोकादायक, तरीही वाहतूक!

$
0
0

टीम मटा, नागपूर

वाहतुकीच्या सोयीसाठी ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी विदर्भाच्या सर्वच भागात पूल उभारले. या पुलांचा आजही वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. पण, यातील अनेक पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. ब्रिटिशांनी तसा पत्रव्यवहारही सरकारशी केला आहे. पण, दिरंगाई इथेही कायम राहिली. महाडचा पूल वाहून गेला. कन्हान नदीवरील पुलाला तडे गेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील तिन्ही पुलांवरून आजही जड वाहतूक होते. यवतमाळ जिल्ह्यातील रुंझाजवळील पुलाला पर्याय उभारण्यात आला. पण, फेरा टाळण्यासाठी नागरिक जुन्यालाच जवळ करतात. बेंबळा नदीवरील पूल मुदतबाह्य झाल्याचे ब्रिटीशांनी पाठविलेल्या पत्रानंतरच कळल्याचेही वास्तव आहे. धोक्याच्या पुलांवरची वाहतूक सुरूच आहे. भंडारा आणि अमरावतीच्या पुलांचा याला अपवाद आहे.

बुलडाण्यात धोक्याचा त्रिकोण

महाडच्या घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त होत असतानाच बुलडाणा जिल्ह्यात असे तीन पूल असल्याचे समोर आले आहे. या पुलांवरून अजूनही वाहतूक सुरूच आहे.

बांधकाम विभागाच्या बुलडाणा कार्यालयांतर्गत दहा मोठे पूल आहेत. त्यापैकी तीन पूल ब्रिटिशकालीन आहेत. राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आलेल्या मलकापूर-सोलापूर आणि देऊळगावरजानजीक आमणा नदीवरील पूल (६०.९७ मीटर लांब), देऊळगावमहीनजीक खडकपूर्णा नदीवरील (१०५ मीटर लांबी) या दोन अनुक्रमे १९३९ व १९२६मध्ये बांधण्यात आलेल्या पुलावरून जड वाहतूकदेखील सुरू आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती व अकोल्यापेक्षा बुलडाणा जिल्ह्याच्या आरोग्यविषयक सुविधा व औद्योगिक उलाढालीसाठी मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद महत्वाचे शहर आहे. त्यामुळे हजारो वाहनांची ये-जा असते. चोखासागर हा मोठा प्रकल्प खडकपूर्णा नदीवर आहे. तेथून काही अंतरावरच देऊळगावमहीनजीक खडकपूर्णा नदीवर हा पूल आहे. याशिवाय मेहकरनजीक पैनगंगा नदीवरदेखील १९२६ला बांधण्यात आलेला पूल अद्याप कार्यान्वित आहे. याठिकाणी नवीन पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी जुन्या पुलावरून वाहतूक सुरूच आहे. बांधकाम विभागाच्या खामगाव कार्यालयाच्या कक्षेतही पूर्णा नदीवरील नांदुरा तालुक्यातील येरळी आणि शेगाव तालुक्यातील खिरोड्याचा पूल आहे. १९२६च्या सुमारास या पुलांची निर्मिती झाली आहे. खिरोडा येथे अपघाताच्या अनेक घटना आजपर्यंत झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे खामगाव-चिखली मार्गावरही एका नाल्यावर ब्रिटीशकालीन पूल आहे. पुढे खामगावपासून जालन्याला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. नांदुरा-मोताळा मार्गावर विश्वगंगा नदीवर १९३३च्या सुमारास बांधलेला पूल आजही वाहतुकीचे ओझे झेलत आहे.

ब्रिटिशांच्या पत्रानंतर जाग

यवतमाळ-धामणगाव मार्गावर ब्रिटिशांनीच बेंबळा नदीवर १९०१च्या सुमारास पूल बांधला होता. २००१मध्ये १०० वर्ष या पुलाला पूर्ण होताच ब्रिटिश कंपनीने सार्वजनिक बांधकाम खात्याला कराराप्रमाणे जबाबदारी संपल्याचे कळविले होते. या पत्रामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. ब्रिटिश कंपनीजवळ या पुलाचा सर्व रेकॉर्ड होते. पण, बांधकाम विभागाजवळ याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही. जिल्ह्यातील सर्वात जुना अशीच याची ओळख होती. शेवटी ब्रिटिश कंपनीने धोक्याची सूचना दिल्यावर बांधकाम खात्याने आठ कोटींचा खर्च करून नवा पूल बांधला. जुना ब्रिटिशकालीन पूल उभा असला तरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कारध्याच्या पुलाला क्लिअरन्स

भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर ब्रिटिशांनी पूल बांधला होता. गोसे धरण बांधल्यानंतर हा पूल पाण्याखाली येण्याचा धोका व्यक्त झाला. ही अडचण दूर करण्यासाठी नवीन अधिक उंच पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून वाहतूकही सुरू आहे. जुन्या पुलावरूनही वाहतूक केली जाते. या पुलाला 'क्लिअरन्स' मिळालेले आहे. याचे बांधकाम १९२९मध्ये करण्यात आले होते.

अमरावती सुस्थितीत

अमरावती जिल्ह्यातील सारेच ब्रिटिशकालीन पूल सुस्थितीत असल्याची माहिती आहे. अचलपूर आणि मेळघाटात ब्रिटिशांचे वास्तव्य होते. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी या भागात पूल बांधण्यात आले. यात अमरावतीजवळील वलगाव नदीवरील पेढी, परतवाडा तालुक्यातील आसेगाव येथील पूल, अचलपूर तालुक्यातील पिली नदीवरील भोगपूर्णा व धारणी तालुक्यातील गडगा नदीवरील दगडा हा पूल ब्रिटिशकालीन असून त्यांनी शंभरी ओलांडली आहे. परंतु काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक धनंजय धवड यांनी पुलांचे नूतनीकरण केले. चारही पूल दगडाने बांधलेले आहेत. यातील काही पूल एकपदरी होते. या पुलांना दोन पदरी करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>