Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

आता किराणाही मिळावा कार्डवर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे पूर्ण होत आहेत. आता इतक्या वर्षांनी तरी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आधुनिक व्यवहारांची नितांत गरज आहे. यासाठी अगदी गल्लीबोळातील किराणादेखील ग्राहकांना रोखीऐवजी कार्डने मिळावा. एकूणच स्वातंत्र्य‌दिनी रोख व्यवहारांपासून स्वातंत्र्यांचा हुंकार अ.भा. व्यापारी महासंघ (कॅट) करणार आहे.

देशभरातील २० हजाराहून व्यापारी संघटना व जवळपास ५ कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्त्व करणारी 'कॅट' ही मोठी संघटना आहे. यामुळेच 'कॅट'च्या मागणीनुसार छोट्या व असंघटित विक्रेत्यांसाठी मुद्रा कर्ज योजना केंद्र सरकारने लागू केली. त्यानंतर आता कॅटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विशेष आघाडीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या आघाडींतर्गत आता यंदाचा स्वातंत्र्यदिन आणखी वेगळा असेल.

मूळ नागपूरचे असलेले कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी सांगितले की, 'रोखरहित अर्थव्यवस्था ही आधुनिक अर्थव्यवस्था आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठीच आम्ही मागील महिन्यात शेतकरी, उत्पादक, वितरक, घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेते या सर्वांची विशेष आघाडी उघडली. त्याद्वारे सर्वांना एकत्रित करुन रोखरहित व्यवहारांचा प्रसार केला जात आहे. याच श्रेणीत आता १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन हा रोख व्यवहारांपासून स्वातंत्र्य मिळविण्याचा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

कॅटकडून यंदाच्या स्वातंत्रदिनी रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. परंतु या प्रकारचा उपक्रम राबविण्यात सर्वात मोठी अडचण छोट्या विक्रेत्यांची असते. या विक्रेत्यांना वितरकाकडून माल खरेदी करण्यासाठी बँका कर्ज देत नाहीत. पण अशावेळी छोट्या विक्रेत्यांनी क्रेडीट कार्ड खरेदी करावे. वितरकाकडून क्रेडिट कार्डद्वारेच खरेदी करावी. या खरेदीचा पैसा वसुलण्यासाठी ग्राहकांना माल विकताना त्याचे पेमेंट ग्राहकांकडून थेट क्रेडिट कार्ड असलेल्या बँकेतच जमा करावे. जेणे करुन विक्रेता अडचणीत येणार नाही, वितरकाला त्याचे पैसे मिळतील व ग्राहकांनादेखील सोप्या पद्धतीने खरेदी करता येईल. विविध प्रकारचे मोबाईल व्हॅलेट हा त्याचाच एक भाग आहे. यातून अखेरीस रोखरहित व्यवहारांचे क्षेत्र वाढण्यास फायदा होईल. यादृष्टीनेच हा उपक्रम स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने राबविला जाईल, असे भरतीया यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>