Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

एव्हरेस्ट अवघ्या दोन टप्प्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

माऊंट एव्हरेस्टची चढाई ही जगातील सर्वच गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक असते. गिर्यारोहकांना कायमच आव्हान देणाऱ्या माऊंट एव्हरेस्टकडे नागपुरातील प्रणव बांडाबुचे याने आगेकूच सुरू केली आहे. एव्हरेस्टवर पाऊल टाकण्यापासून प्रणव अजून दोन टप्पे दूर आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत तो हे शिखर पादाक्रांत करेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे.

प्रणव हा सीएसी ऑलराऊंडर या साहसी खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. एमबीए झालेला प्रणव विविध देशातील गिर्यारोहकांसह एव्हरेस्टची चढाई करीत आहे. समुद्रसपाटीपासून २९,०२९ फूट उंचीवर असलेल्या एव्हरेस्टच्या चढाईदरम्यान २६ वर्षीय प्रणवची प्रकृतीदेखील बिघडली होती. मात्र, या अडचणींवर मात करीत त्याने आगेकूच कायम ठेवली आहे.

एव्हरेस्ट शिखर प्रचंड उंचीवर असल्याने तेथील वातावरणात सातत्याने बदल होत असतात. या बदलांशी जुळवून घेण्यात गिर्यारोहकांना कसरत करावी लागते. प्रणव आणि त्याच्या साथीदारांनाही सध्या या प्रक्रियेतून जावे लागत आहे. वातावरणाशी जुळवून घेण्याकरिता हे गिर्यारोहक सध्या प्रयत्न करीत आहेत.

अंतिम चढाईसाठी हा गट १७ मे रोजी निघणार असून, २३ मेपर्यंत माऊंट एव्हरेस्टवर पोहोचण्याचे लक्ष्य बाळगून आहे. सगळे सुरळित पार पडल्यास २३ मे पर्यंत जगातील सर्वात उंच शिखरावर पाय ठेवण्याचे प्रणवचे स्वप्न साकार होणार आहे. या चढाईदरम्यान, वातावरणाने साथ देण्याची अपेक्षा गिर्यारोहक बाळगून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>