कार्यशाळेत हँडवॉशचे प्रात्यक्षिक कुंदा जगनाडे यांनी, दत्तक शाळेचे प्रात्यक्षिक श्रीमती पोयाम यांनी दाखविले. ज्ञान रचनावादी उपक्रमातील प्रगत शाळा चलचित्राद्वारे वंदना माटे यांनी तर, मिळणारे योगदान या विषयावर शिक्षण समिती सभापती गोपाल बोहरे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी मीना गुप्ता यांनी सर्वशिक्षण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. उपशिक्षणाधिकारी कुसूम चाफसकर यांनी पटनोंदणीबाबत मार्गदर्शन केले. सकाळी १० ते ५.३०पर्यंत ही कार्यशाळा चालली. यात मनपात कार्यरत सर्व शाळा निरीक्षक, सर्व मुख्याध्यापक, सर्व शहर साधन केंद्र समन्वयक, गुणवत्ता कक्ष समन्वयक व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यशाळेत मनपा सर्वशिक्षा अभियानांतर्गत या शैक्षणिक सत्रामध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, गणवेश योजना, शाळा परिसराची रंगरंगोटी, पटनोंदणी कार्यक्रम, शाळाबाह्य मुले, शालेय पाठ्यपुस्तक योजना, शाळा परिसराची स्वच्छता, शालेय पोषण आहार, प्रगत शाळेचे निकष, ज्ञानरचनावादानुसार वर्ग खोल्या व साहित्य तयार करणे, शालेय ग्रंथालय समृध्द करणे, प्रत्येक शाळेत हँड वॉश स्टेशन तयार करणे, अपंग समावेशित उपक्रम तसेच शिक्षकाकरिता प्रशिक्षण आयोजित करणे व शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करणे आदी विषयांना स्पर्श करण्यात आला. प्रास्ताविक सहायक अधिकारी धनलाल चौलीवार, संचालन लता पोयाम यांनी केले. आभार अमृता हिसेकर यांनी मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट