या प्रकरणातील तक्रारकर्ते हे ९ मे रोजी भंडाऱ्याहून नागपुरात येत होते. यावेळी पारडी नाक्यावर त्यांची गाडी अडविण्यात आली. तेथे चालान फाडून त्यांची गाडी पोलिसांनी आपल्याकडे ठेवली. या प्रकरणी तक्रारकर्त्याने कोर्टात रीतसर दंडाचे शुल्क भरले आणि आपली गाडी सोडविण्यात गेले. परंतु, राठोड यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्याने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. खात्याचे अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. राठोड यांना दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट