विधान परिषदेच्या १० जागांपैकी भाजप ५, काँग्रेस ३ आणि शिवसेनेच्या दोन जागा रिक्त होत आहे. २८ मतांचा कोटा आहे. त्यानुसार, भाजपचे चार उमेदवार निवडून येतात. शिवसेनेची मदत घेतल्यास पाचवा उमेदवार निवडून येईल. या पाचपैकी रिपाई, स्वाभिमान शेतकरी आणि विनायक मेटेंची संपणारी आमदारकी पुन्हा देता येऊ शकते. आधी ठरल्याप्रमाणे रिपाईला १० टक्के सत्तेत वाटा हवा होता. मात्र, समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे किमान पाच टक्के वाटा अपेक्षित आहे. रिपाई राष्ट्रीय स्तरावर वाढत आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यानुसार आपण दिल्लीतच राहणार आहे. बाबासाहेबानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात दलित नेतृत्वाला संधी मिळाली नाही. आपण राज्यसभेत आहोत. भाजपसोबत जाताना, 'सत्ता आल्यास केंद्रात मंत्रिपद' असे ठरले होते. त्याची पूर्तता आता व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात पक्षाला आमदारकी देऊन मंत्रिपदही द्यावे लागेल. मुंबई, मराठवाडा या भागाला पक्षातर्फे आमदारकी व मंत्रिपद मिळाले. प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांचे नाव सुरू आहे का, यावर त्यांनी विदर्भात पक्षाची ताकद आहे. त्यानुसार संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले.
यूपीमध्ये रिपाइंत अनेकांचा प्रवेश
उत्तरप्रदेशमध्ये बसपाने रिपाइंचा हत्ती पळविला. या राज्यात समाजाचे मोठे मतदान आहे. आता बसपसोबत नाराज झालेले अनेकजण आगामी निवडणुकीत रिपाइंत येत असल्याचा दावा आठवलेंनी केला. या निवडणुकीपूर्वी रिपाइंचे ऐक्य झाल्यास समाजाला त्याचा फायदा होईल तसेच एकतेचे बळ दिसेल, याकडे आठवलेंनी लक्ष वेधले.
ऐक्यासाठी समाजाने दबाव आणावा
रिपाइं ऐक्यासाठी आपण दोन पावले मागे गेलो. मध्ये आपण, कवाडे, गवई एकत्र आलो. आंबेडकरी जनतेने मदत केली. पण, हे ऐक्य पूर्ण झाल्याचे समाधान समाजाला झाले नाही. ऐक्यासाठी कुठलीही भूमिका घ्यायला आपण तयार आहोत. आंबेडकर यांनी स्पष्ट करावे. बैठक आयोजित केल्यावर ते येत नाहीत. त्यामुळे समाजाने सर्व नेत्यांवर दबाव आणावा. अनिच्छा दाखविणाऱ्यास जिल्हाबंदी वा त्यांच्या सभेत जाब विचारावा, अशी भूमिका आठवले यांनी मांडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट