Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

हिंदी जगात चवथ्या स्थानावर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

देशाला एका भाषेने जोडल्यास राष्ट्रीय एकात्मता साधणे सोपे जाईल, असे मत अनेक मान्यवरांनी आणि साहित्यिकांनी व्यक्त केले आहे. परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून अनेकदा वाद झालेत आणि ते आजही सुरु आहेत. असे असले तरीसुद्धा देशात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा ही हिंदीच हे निर्विवाद सत्य आहे. इतकेच नाही तर जगातील सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकीही हिंदी आहे. हिंदीने यात चवथा क्रमांक पटकाविला आहे. अॅक्रिडेटेड लॅन्गवेज सव्हिसेसतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हे सत्य बाहेर आले आहे.

यंदा मे महिन्यात सर्वेक्षण जाहीर करण्यात आले होते. जगात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चायनीज मांड्रीन या भाषेचा पहिला क्रमांक आहे. ही भाषा जाणणाऱ्या द्विभाषींची जगात सगळ्यात जास्त गरज पडते. चीनमधील सगळ्यात महत्त्वाच्या बोलींपैकी ही एक आहे. चीन आणि तायवान येथे ही भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते. जगदातील जवळपास १४.४ टक्के म्हणजेच ११९ कोटींपेक्षा जास्त लोक ही भाषा बोलतात. या यादीत स्पॅनीश भाषेचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिका आणि युरोप खंडात ही भाषा दूरवर पसरलेली आढळून येते. जगातील ४१ कोटी लोकांची ही मातृभाषा आहे. या भाषेतील कास्ट‌िलीअल ही बोलीभाषा स्पेनमधील राष्ट्रीय दर्जाची भाषा आहे.

इंग्रजीने या यादीत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या पंधरा वर्षांपर्यंत इंग्रजी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा होती. परंतु या कालावधीत अचानक स्पॅनीश भाषिकांची संख्या वाढल्याने ही भाषा आता तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. परंतु जगातील सगळ्यात प्रभावी भाषा ही आजही इंग्रजीच आहे. कारण ती जगातील सगळ्यात जास्त देशांमध्ये बोलली जाते. जगात आज ३३ कोटी लोकांची मातृभाषा ही इंग्रजी आहे. उर्दू मिश्रीत हिंदी अथवा हिंदीने या यादीत चवथे स्थान प्राप्त केले आहे. हिंदी भाषा अनेक बोलीत बोलली जाते. परंतु हिंदी आणि उर्दू यांचा इतिहासात बरेच साम्य आढळून येते. या दोन्ही भाषांमधील अनेक शब्द सारखेच आहेत. आज हिंदी ही जगातील २६ कोटी लोकांची मातृभाषा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>